AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karisma And Rohit : करिश्मा कपूरसह हिटमॅनने धरला ताल, ‘ले गई’ गाण्यावर रोहित शर्माचा भन्नाट डान्स; Video व्हायरल

Karisma And Rohit : भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माच्या 'फॅमिली फुल हाउस विथ रोहित शर्मा' या शोला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या शोमध्ये आलेल्या करिश्मा कपूरसोबत हिटमॅनने ठेका धरत डान्सही केला. त्याचाच व्हिडीओ समोर आलाय.

Karisma And Rohit : करिश्मा कपूरसह हिटमॅनने धरला ताल, ‘ले गई’ गाण्यावर रोहित शर्माचा भन्नाट डान्स; Video व्हायरल
| Updated on: Oct 24, 2026 | 3:45 PM
Share

Karisma Kapoor And Rohit Sharma : भारताटा लोकप्रिय क्रिकेटर आणि ‘हिटमॅन’ नावाने प्रसिद्ध असलेला रोहित शर्मा सध्या चर्चेत आहे. त्याच्या ‘फॅमिली फुल हाउस विथ रोहित शर्मा’ याला प्रेक्षकांकडून मोठं प्रेम मिळत असून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी आत्तापर्यंत आले आहेत. बॉलिवूडमधील सौंदर्यवती अभिनेत्री करिश्मा कपूर नुकतीच या शोमध्ये गेस्ट म्हणून आली होती.तेव्हा दोघांमध्ये कमाल केमिस्ट्री पहायला मिळाली. त्यांनी चांगलीच धमाल केली.

या शोमध्ये आलेली करिश्मा कपूर आणि रोहित शर्मा यांनी अभिनेत्रीच्या ‘दिल तो पागल है’ या प्रसिद्ध चित्रपटातील ‘ले गई ले गई’ या लोकप्रिय गाण्यावर नृत्य केलं. करिश्माने रोहित शर्माला गाण्याच्या सिग्नेचर स्टेप्स शिकवल्या आणि रोहित शर्मानेही न लाजता, उलट संपूर्ण उत्साहाने तिच्या पावलावर पाऊल ठेवत मस्त डान्स केला.

करिश्माला काय म्हणाला रोहित शर्मा ?

खरं तर, डान्स परफॉर्मन्सनंतर रोहित शर्माने करिश्मा कपूरसमोर हात जोडून तिचे आभार मानले. आपला आनंद व्यक्त करताना तो म्हणाला, “ आम्ही लहानपणापासून चित्रपट पाहत पाहत मोठे झालो आहोत आणि आज मला तुमच्यासोबत डान्स करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. माझा तर आजचा दिवसच बनला, भावा!” असं त्याने उत्साहाने सांगितलं. तर दुसरीकडे करिश्मानेही रोहितच्या डान्स परफॉर्मन्सचं भरभरून कौतुक केलं. या दोघांची धमाल आणि डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. क्रिकेट आणि बॉलिवूडचा हा अनोखा संगम चाहत्यांना चांगलाच आवडलाय. त्या व्हिडीओवर विविध कमेंट्सही आल्या आहेत.

दरम्यान, यापूर्वीही करिश्मा कपूरचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये तिने रोहित शर्माला एक नवीन टोपणनाव दिले होते. ती हिटमॅनला ‘पूकी पुलशॉटर’ असे म्हणताना दिसली होती.

रोहित शर्माच्या शोमध्ये कोणी-कोणी लावली हजेरी ?

‘फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा’ या रोहित शर्माच्या लोकप्रिय शोमध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंनी हजेरी लावली आहे. क्रिकेटविश्वातून श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, अभिषेक नायर आणि शिखर धवन यांसारखे खेळाडू या शोचा भाग बनले. तर चित्रपटसृष्टीतून सिद्धार्थ मल्होत्रा, तमन्ना भाटिया, सुनील शेट्टी, नेहा धूपिया, अंगद बेदी, मीका सिंह आणि शहनाज गिल यांनी शोमध्ये हजेरी लावली होती. याशिवाय भारती सिंह, हर्ष लिंबाचिया, कृष्णा अभिषेक, अर्चना पूरण सिंह, राकेश बेदी आणि चंदन प्रभाकर यांसारखे अनेक प्रसिद्ध कलाकारही या शोमध्ये दिसले.

Follow Us
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...
एकनाथ शिंदेंच्या मुलांना पैसे दिले, हे रामदास कदमांनीच सांगितलं....
Manoj Jarange On Viral Clip : एकनाथ शिंदेंच्या मुलांना पैसे दिले, हे रामदास कदमांनीच सांगितलं; जरांगेंचा दावा, महायुतीत पुन्हा खळबळ
हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार! प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला
Prasad Lad On Sanjay Raut : हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार! प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला; ऑडिओ क्लिपवरून राजकीय घमासान
500 कोटींची ऑडिओ टेप भाजपच्या आमदारानं फोडली संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Jarnage Viral Audio Clip : 500 कोटींची ऑडिओ टेप भाजपच्या आमदारानं फोडली संजय राऊतांचा गंभीर आरोप; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप्सची फॉरेन्सिक तपासणी सुरू; 500 कोटींच्या..
Pankaj Bhoyar : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप्सची फॉरेन्सिक तपासणी सुरू; 500 कोटींच्या आरोपांमागचं सत्य लवकरच समोर येणार?