AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karisma Kapoor | करिश्मा कपूर – संजय कपूर पुन्हा एकत्र? डिनर डेटचा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांना समायरा ही मुलगी आणि कियान हा मुलगा आहे. करिश्माला घटस्फोट दिल्यानंतर संजयने प्रिया सचदेवशी लग्न केलं. या दोघांना अझरियास हा मुलगा आहे. तर प्रियाचंही हे दुसरं लग्न आहे.

Karisma Kapoor | करिश्मा कपूर - संजय कपूर पुन्हा एकत्र? डिनर डेटचा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
Karisma Kapoor and Sunjay KapurImage Credit source: Instagram
| Updated on: May 28, 2023 | 11:51 AM
Share

मुंबई : कपूर घराण्यातील करिश्मा कपूरचं वैवाहिक आयुष्य बरंच चर्चेत होतं. 2003 मध्ये तिने बिझनेसमन संजय कपूरशी लग्न केलं होतं. मात्र या दोघांच्या नात्यात हळूहळू इतकी कटुता आली की अखेर कोर्टापर्यंत प्रकरण पोहोचलं होतं. करिश्माने संजयवर मारहाणीचाही आरोप केला होता. अखेर 2016 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. मात्र करिश्मा सध्या पुन्हा एकदा तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीसोबत दिसतेय. मुलाच्या वाढदिवसानंतर आता पुन्हा एकदा करिश्मा आणि संजय यांना एकत्र डिनर डेटवर गेल्याचं पहायला मिळालं. या दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबईतील एक रेस्टॉरंटबाहेर करिश्मा आणि संजय यांना पापाराझींनी एकत्र पाहिलं. रविवारी रात्री करिश्मा तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीसोबत डिनर डेटला गेली होती. यावेळी तिने काळ्या रंगाचा फ्लोरल ड्रेस परिधान केला होता. तर संजयने ब्लॅक अँड व्हाइट सूट परिधान केला होता. हे दोघं जेव्हा एकत्र रेस्टॉरंटबाहेर निघाले, तेव्हा पापाराझींनी त्यांना पाहिलं. दोघांनी कॅमेरासमोर हसून पोझ दिले आणि त्यानंतर निघून गेले. करिश्मा आणि संजय यांना एकत्र पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या दोघांना ट्रोल केलं, तर काहींनी त्यांना पाठिंबा दिला.

पहा व्हिडीओ

‘करिश्मा आणि संजय यांचं भेटणं फक्त मुलांसाठी आहे. ती योग्य पद्धतीने कुटुंबाला मॅनेज करतेय’, असं एकाने लिहिलं. तर काहींनी करिश्माच्या घटस्फोटावर प्रश्न उपस्थित केला. ‘हा खूप चांगला ट्रेंड आहे. लग्न करा, पतीला घटस्फोट द्या आणि मग मित्र बना’, असा उपरोधिक टोला दुसऱ्या युजरने लगावला. ‘करिश्मा खूप चांगली आहे. तिला याच्यापेक्षा खूप चांगला पार्टनर मिळू शकतो’, असंही काहींनी लिहिलं आहे. काहींनी करिश्माला तिनेच केलेल्या पतीवरील आरोपांची आठवण करून दिली.

संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांना समायरा ही मुलगी आणि कियान हा मुलगा आहे. करिश्माला घटस्फोट दिल्यानंतर संजयने प्रिया सचदेवशी लग्न केलं. या दोघांना अझरियास हा मुलगा आहे. तर प्रियाचंही हे दुसरं लग्न आहे. पहिल्या लग्नापासून तिला सफिरा ही मुलगी आहे. याआधी करिश्मा आणि संजय यांचा मुलगा कियानचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. त्यावेळी संजयची पत्नी प्रियासुद्धा त्यांच्यासोबत होती.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.