‘खात्यात किती पैसे माहिती नाही, महागडे पदार्थ खाल्यानंतर…’, कार्तिक आर्यन कडून हिशोब घेणारी ‘ती’ कोण?
Kartik Karyan : कोट्यवधी रुपये कमावतो अभिनेता कार्तिक आर्यन, पण अभिनेत्याला नाही माहिती खात्यात किती आहे रक्कम, 'या' व्यक्तीकडे आहे कार्तिक आर्यन याच्या कमाईचा हिशोब... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कार्तिक आर्यन याच्या कमाईची चर्चा...

मुंबई | 22 नोव्हेंबर 2023 : अभिनेता कार्तिक आर्यन याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजाबत चाहत्यांचं मनोरंजन केलं. कार्तिक याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. आता देखील कार्तिक आर्यन याने त्याच्या कमाईबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कार्तिक आर्यन याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. आज कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या कार्तिक आर्यन याला त्याच्या खात्यात किती पैसै आहेत, हे देखील माहिती माहिती नाही… महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्तिक आर्यन याच्या कमाईचा हिशोब त्याची आई पाहाते… नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्याने मोठा खुलासा केला आहे.
कार्तिक आर्यन म्हणाला, ‘माझ्या खात्यात किती पैसे आहेत मला माहिती नाही. मी कमावत असलेल्या पैशांचा हिशोब माझी आई ठेवते. मी फक्त सिनेमाची कथा आणि माझ्या भूमिकेवर लक्ष केंद्रीत करतो.. बकी मानधन आणि इतर गोष्टी माझी आई पाहाते. आई मला महिन्याला खर्चासाठी ठाराविक रक्कम देते.’
पुढे अभिनेता म्हणाली, ‘वाढदिवसाच्या दिवशी मला कार घ्यायची होती. पण माझ्याकडे सध्या पार्किंग नाही आणि त्यासाठी मी घर घेऊ शकत नाही. तरी देखील मला कार घ्यायची होती. पण आईने मला नकार दिला. आई मला म्हणाली, सध्या पैसे नाहीत, तू कार घेऊ शकत नाही…’
‘मला आईची प्रत्येक गोष्ट ऐकावीच लागते. कधी-कधी मला राग देखील येतो. कारण कोणतीही गोष्ट करण्याआधी मला आईची परवानगी घ्यावी लागते. कार तर फार मोठी गोष्ट आहे, मी कधी हॉटेलमध्ये गेलो आणि जास्त बिल आलं की, आईचा फोन येतो.. तू काय खल्ला ज्यामुळे एवढं बिल आहे… तू तर डाएटवर आहेस…’ असं देखील अभिनेता म्हणाला..
कार्तिक आर्यन याच्या स्वभावाला घाबरते अभिनेत्याची आई
‘आईला असं वाटतं की वायफळ खर्च जास्त करतो. मी अनेकदा माझ्या कमाईपेक्षा अधिक पैसे खर्च केले आहेत आणि ही गोष्ट माझ्या आईला कळली आहे. कमाईपेक्षा अधिक खर्च केलेला माझ्या आईला आवडत नाही. म्हणून तिने मला पॉकेट मनीवर ठेवलं आहे.. मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो… माझ्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे आणि ती माझी आई आहे…’ असं देखील कार्तिक आर्यन म्हणाला…
