AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या कमाईला लागू शकतो ब्रेक; अवघ्या 3 दिवसांत ‘या’ सिनेमाची 100 कोटींची कमाई

अवघ्या तीन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात कमाईचा 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरील इतर चित्रपटांसमोर त्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

'राजा शिवाजी' चित्रपटाच्या कमाईला लागू शकतो ब्रेक; अवघ्या 3 दिवसांत 'या' सिनेमाची 100 कोटींची कमाई
'राजा शिवाजी' चित्रपटाच्या कमाईला लागू शकतो ब्रेकImage Credit source: Instagram
| Updated on: May 18, 2026 | 12:30 PM
Share

अभिनेता रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या 17 दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करतोय. प्रदर्शनाच्या 17 व्या दिवशी या चित्रपटाने तीन कोटी रुपयांचा गल्ला जमवला असून लवकरच तो 100 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये जाण्याची शक्यता आहे. परंतु अशातच बॉक्स ऑफिसवर एक असा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्याने अवघ्या तीन दिवसांत कमाईचा 100 कोटींचा आकडा पार केला आहे. 2026 मधील हा सर्वांत जलद गतीने सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. त्यामुळे ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाच्या कमाईला ब्रेक लागू शकतो, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत.

सूर्या आणि त्रिशा कृष्णन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘करुप्पू’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले आहेत. या चित्रपटाने ओपनिंग वीकेंडलाच एक-दोन नाही तर चार रेकॉर्ड बनवले आहेत. हा 2026 मधील तमिळ भाषेतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. या चित्रपटाने फक्त 3 दिवसांत 100 कोटींच्या क्लबमध्ये एण्ट्री केली आहे. तर पहिल्या दोन दिवसांत जगभरात 74 कोटी रुपयांचा बिझनेस झाला आहे.

‘करुप्पू’ची भारतातील कमाई

पहिला दिवस- 15.50 कोटी रुपये दुसरा दिवस- 24.15 कोटी रुपये तिसरा दिवस- 28.35 कोटी रुपये भारतातील नेट कलेक्शन- 68 कोटी रुपये

‘करुप्पू’ने 2026 या वर्षातील टॉप 5 सर्वाधिक कमाई करणाऱ्या तमिळ भाषेतील चित्रपटांनाही मागे टाकलं आहे.

  1. करुप्पू- 100 कोटी रुपये
  2. पराशक्ती- 84.75 कोटी रुपये
  3. थाई किज्वी- 84.05 कोटी रुपये
  4. युथ- 70.78 कोटी रुपये
  5. लव्ह इन्शुन्स कंपनी- 61.92 कोटी रुपये

दुसरीकडे ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 52.65 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यातील कमाईचा आकडा 24.30 कोटी रुपये इतका होता. प्रदर्शनाच्या 15 व्या दिवशी 1.45 कोटी रुपये आणि 16 व्या दिवशी 2.70 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. सॅकनिल्कच्या ट्रेंड रिपोर्टनुसार ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या 17 व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या रविवारी 3.05 कोटी रुपये कमावले आहेत. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई 84.15 कोटी रुपये झाली आहे. हा चित्रपट लवकरच नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’चा विक्रम मोडणार, अशी अपेक्षा आहे. परंतु ‘करुप्पू’मुळे नवीन आव्हान निर्माण झालं आहे.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?