KBC: कौन बनेगा करोडपतीचा मालक नेमका आहे तरी कोण? विजेत्यांना कोण देतं एवढे पैसे?
'कौन बनेगा करोडपती' हा टीव्ही शो भारतामध्ये चांगलाच हीट ठरला आहे. ज्ञान आणि सोबतच मनोरंजनाचा संगम म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं, या कार्यक्रमातील विजेत्यांना पैसे नेमके कसे मिळतात? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

‘कौन बनेगा करोडपती’ हा टीव्ही शो भारतामध्ये चांगलाच हीट ठरला आहे. ज्ञान आणि सोबतच मनोरंजनाचा संगम म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं, कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम आपल्या प्रत्येक सीजनमध्ये वेगवेगळ्या लोकांना कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी देतो. या शो ने केवळ कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या लोकांना करोडपतीच बनवले नाही तर त्यासोबतच ज्ञान देखील वाढवलं. हा शो प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. मात्र अनेकांच्या मनात असा प्रश्न असतो की, या शोचा मालक कोण आहे? आणि या कार्यक्रमातील विजेत्यांना पैसे नेमकं कोण देतं? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
केबीसीचा मालक कोण?
केबीसीचे सर्व मालकी हक्क सोनी पिक्चर्स टेलिव्हिजनकडे आहेत. हा शो ब्रिटिश टिव्ही शो ‘हू वांट्स टू बी अ मिलियनेअर’ची भारतीय फ्रेंचाइजी आहे. सोनी पिक्चर्स या मूळ शोचे परवानाधारक भागीदार देखील आहेत. या अंतर्गत भारतामध्ये ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाची निर्मिती होते.
अमिताभ बच्चन यांची भूमिका
या शो ला जर सर्वात मोठी ओळख कोणी बनवून दिली असेल तर ती म्हणजे बीग बी अमिताभ बच्चन यांनी. 2000 मध्ये पहिल्यांदा या शोच भारतात प्रसारण करण्यात आलं होतं, तेव्हापासून ते आजपर्यंत अमिताभ बच्चन हेच या शोचे होस्ट आहेत. त्यांनी या कार्यक्रमाला भारताच्या प्रत्येक घरात पोहोचवण्याच आणि लोकप्रियतेच्या एका नव्या उंचीवर नेण्याचं काम केलं, मिडिया रिपोर्टनुसार आमिताभ बच्चन यांना या कार्यक्रमासाठी प्रत्येक एपिसोड मागे मोठं मानधन मिळतं, ज्याचा आकडा हा कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे.
शो मधून कमाई कशी होते?
या शो चा मुख्य उत्पन्न स्त्रोत हा जाहिराती आहे, या शोचा भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये प्रचंड टीआरपी आहे, त्यामुळे अनेक मोठे आणि नावाजलेले ब्रॅन्ड या कार्यक्रमात आपली जाहिरात देत असतात, त्यामधून कमाई होते, जो व्यक्ती जिंकतो त्याला चॅनलकडून पैसा मिळतो, सर्व प्रकारचे टॅक्स कपात केल्यानंतर हे पैसे त्याच्या खात्यात जमा होतात.
