AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पापाराझींनी चुकीचे नाव घेताच अभिनेत्रीचा संताप म्हणाली… तर, काहींनी चक्क ‘डोसा’ म्हणून चिडवलं

पापाराझींनी अभिनेत्रीचे चुकीचे नाव घेत तिला चिडलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अभिनेत्री संतापलेली पाहायला मिळाली. तसेच तिने स्वत:चा राग आवरत पापाराझींना स्पष्ट शब्दात सुनावलं.

पापाराझींनी चुकीचे नाव घेताच अभिनेत्रीचा संताप म्हणाली... तर, काहींनी चक्क 'डोसा' म्हणून चिडवलं
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Dec 28, 2024 | 2:57 PM
Share

जिथे  सेलिब्रिटी तिथे पापाराझी असतातच. पण कित्येकवेळेला पापाराझींसोबत सेलिब्रिटींचे वाद झालेले आपण पाहतो. किंवा सेलिब्रिटींना कोणत्या ना कोणत्या कारणाने पापाराझींचा राग आलेलाही आपण पाहतो. असंच काहीस घडलं आहे एका अभिनेत्रीसोबत.

फोटो काढत असताना पापाराझींवर एक अभिनेत्री चिडलेली पाहायला मिळाली. पापाराझींनी तिचं चुकीचे नाव पुकारल्याने अभिनेत्रीला राग आल्याचं समोर आलं. या अभिनेत्रीने तिचा राग आवरत शांतपणे पापाराझींना सुनावलं देखील.

पापाराझींनी नावाचा चुकीचा उल्लेख केल्यानं संताप 

ही अभिनेत्री आहे कीर्ती सुरेश. कीर्ती तिच्या बॉलिवूड पदार्पणामुळे सध्या चर्चेत आली आहे. 25 डिसेंबर रोजी कीर्तीचा पहिला बॉलिवूड सिनेमा ‘बेबी जॉन’ प्रदर्शित झाला. कीर्तीने या चित्रपटात वरुण धवन आणि वामिका गब्बी यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली असून, सध्या हे तिघेही प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

कीर्तीचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यात ती पापाराझींवर थोडीशी चिडलेली दिसली. तिच्या नावाचा चुकीचा उल्लेख आणि तिला ‘डोसा’ अशी हाक मारल्याने ती चिडली होती.

पापाराझींकडूनच हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.  कीर्ती मुंबईत चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आली होती. तेव्हा पापाराझींनी कीर्तीला ‘क्रिती’ अशी हाक मारायला सुरुवात केली, ज्यामुळे अभिनेत्री नाराज झाली. तेव्हा तिने स्पष्ट सांगितले की, तिचे नाव क्रिती नसून ‘कीर्ती’ आहे.

काहींनी ‘डोसा’ म्हणून हाक मारली

यानंतर काहीजण तिला ‘डोसा’ अशीही हाक मारू लागतात. काही दिवसांपूर्वी तिला डोसा खूप आवडतो, असा एक व्हिडिओ व्हायरल झालेला. पण अशी हाक मारल्यानंतर तिने स्पष्ट प्रतिक्रिया दिली. हसतच शांतपणे कीर्तीने पापाराझींना उत्तर दिलं.  तिने म्हटले की, ‘किर्ती डोसा नाही, कीर्ती सुरेश आहे आणि मला डोसा आवडतो.’ नंतर ती संतापून तेथून निघून गेली नाही तर, तिने हसतच कॅमेऱ्यासमोर पोज दिली.

कीर्तीने यावेळी स्लीव्हलेस डेनिम ड्रेस परिधान केला होता, त्यावर ती मंगळसूत्र फ्लाँट करायला विसरली नाही. अलीकडेच अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली आणि त्यानंतर लगेचच तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट रीलिज झाला.

कीर्तीचा ‘बेबी जॉन’ सिनेमा चर्चेत

कीर्तीचा ‘बेबी जॉन’  सिनेमा थलपथी विजय, सामंथा आणि ॲटली यांच्या ‘थेरी’ या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केवळ 13 कोटींची कमाई केली होती. कॅलिस दिग्दर्शित ‘बेबी जॉन’ हा बॉलिवूड चित्रपट निर्माता म्हणून ॲटलीचा पहिला चित्रपट आहे

कीर्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, तिने अलीकडेच 12 डिसेंबर रोजी गोव्यात तिचा बालपणीचा मित्र आणि दीर्घकालीन बॉयफ्रेंड अँटोनी थट्टिलशी लग्न केले. यावेळी सिनेविश्वातील आघाडीचे अनेक कलाकार उपस्थित होते. गोव्यात या लग्नासाठी त्रिशा कृष्णन, थलपथी विजय, ऐश्वर्या लक्ष्मी आणि इतर अनेकांनी हजेरी लावली होती.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?