नातवंडं खेळवण्याच्या वयात 70 वर्षांचा प्रसिद्ध अभिनेता बनला बाप; 8 व्या मुलाचा जन्म

वयाच्या सत्तराव्या वर्षी प्रसिद्ध अभिनेता पिता बनला आहे. पत्नीने मुलाला जन्म दिल्याची गुड न्यूज त्याने चाहत्यांना दिली आहे. या अभिनेत्याचं हे आठवं अपत्य आहे. तर 2011 मध्ये तो आजोबा बनला होता. अभिनेत्याच्या मोठ्या मुलीने बाळाला जन्म दिला होता.

नातवंडं खेळवण्याच्या वयात 70 वर्षांचा प्रसिद्ध अभिनेता बनला बाप; 8 व्या मुलाचा जन्म
Kelsey Grammer
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 30, 2025 | 11:50 AM

वयाच्या सत्तराव्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात पाळणा हलला आहे. होय.. हे खरं आहे. 70 वर्षीय हॉलिवूड टीव्ही स्टार केल्सी ग्रामरच्या पत्नीने नुकताच मुलाला जन्म दिला आहे. केल्सीचं हे आठवं अपत्य आहे. ‘चीअर्स’ आणि ‘फ्रेजयर’ यांसारख्या शोजमध्ये काम केलेल्या केल्सीने या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आपला 70 वा वाढदिवस साजरा केला. आता तो आठव्या मुलाचा पिता बनला आहे. केल्सीने ‘पॉड मीट्स वर्ल्ड’ या पॉडकास्टदरम्यान चाहत्यांना ही गुड न्यूज दिली. केल्सीची पत्नी केट वॉल्शने चौथ्या बाळाला जन्म दिला असून केल्सीचं हे आठवं अपत्य आहे. एमी पुरस्कार विजेता केल्सी हा हॉलिवूड टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे.

केल्सीने 2011 मध्ये 46 वर्षीय केट वॉल्शशी लग्न केलं होतं. या दोघांना एक मुलगी आणि दोन मुलं आहेत. यावर्षी जून महिन्यात त्यांनी घरात पुन्हा पाळणा हलणार असल्याचं वृत्त जाहीर केलं होतं. पाच वेळा एमी पुरस्कार जिंकलेल्या केल्सीने चार वेळा लग्न केलं आहे. वॉल्शच्या आधी त्याने डान्सर-मॉडेल कॅमिट डोनाटाशी लग्न केलं होतं. त्याआधी ली-ऐन चुहानी आणि डान्स इन्स्ट्रक्टर डोरीन एल्डरमॅनशी लग्न केलं होतं. केल्सीची आता एकूण आठ मुलं असून त्यापैकी सर्वांत मोठी मुलगी ही अभिनेत्री स्पेन्सर ग्रामर आहे.

केल्सी ग्रामर आणि त्याची पत्नी

सिटकॉम स्टार केल्सी ग्रामर ऑक्टोबर 2011 मध्ये आजोबासुद्धा बनले होते. त्यांची मुलगी स्पेन्सरने मुलाला जन्म दिला होता. तिने जेम्स हेस्केथशी लग्न केलंय. 2018 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच उतारवयात मुलांचं संगोपन करण्याचं सौभाग्य प्राप्त झाल्याचा आनंद व्यक्त केला होता. “ही एक खरी देणगी आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात मला मुलांना वाढवण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. मी खरंच भाग्यवान आहे”, असं त्याने म्हटलं होतं.

‘कॅरेन : अ ब्रदर रिमेंबर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान केल्सीने आठव्या बाळाच्या जन्माची गोड बातमी चाहत्यांना सांगितली होती. केल्सीच्या बहिणीची वयाच्या 18 व्या वर्षी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येविषयी आणि आयुष्यभर दु:खाशी झालेल्या सामनाविषयी त्याने या पुस्तकात लिहिलंय.