.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KGF 2: ‘केजीएफ: २’ स्टार यशने नाकारली कोट्यवधींची पान मसालाची जाहिरात; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

यशच्या (Yash) 'केजीएफ 2'ला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळत असताना त्याला कोट्यवधी रुपयांच्या जाहिरातीची ऑफर देण्यात आली. मात्र यशने या कोट्यवधींच्या डीलला नकार दिला. यशसाठी एंडोर्समेंट डील हाताळणाऱ्या एक्सीड एंटरटेन्मेंट एजन्सीने याबाबतची माहिती दिली.

KGF 2: 'केजीएफ: २' स्टार यशने नाकारली कोट्यवधींची पान मसालाची जाहिरात; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
Yash and Akshay KumarImage Credit source: Facebook
| Updated on: May 01, 2022 | 1:25 PM
Share

अभिनेता अक्षय कुमारला (Akshay Kumar) नुकतंच पान मसाला ब्रँडची जाहिरात केल्याने प्रचंड ट्रोल करण्यात आलं. या ट्रोलिंगनंतर अखेर अक्षयने माघार घेत चाहत्यांची माफी मागितली आणि त्या जाहिरातीतून माघार घेतली. आता अक्षयनंतर ‘केजीएफ: चाप्टर 2’चा (KGF 2) अभिनेता यशलाही (Yash) पान मसाला ब्रँडसाठी कोट्यवधी रुपयांच्या एंडोर्समेंट डीलची ऑफर देण्यात आली. मात्र यशने या ऑफरला साफ नकार दिला. यशच्या ‘केजीएफ 2’ला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळत असताना त्याला कोट्यवधी रुपयांच्या जाहिरातीची ऑफर देण्यात आली. मात्र यशने या कोट्यवधींच्या डीलला नकार दिला. यशसाठी एंडोर्समेंट डील हाताळणाऱ्या एक्सीड एंटरटेन्मेंट एजन्सीने याबाबतची माहिती दिली.

टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीचे प्रमुख अर्जुन बॅनर्जी यांनी सांगितलं, “मला आठवतंय की मार्च 2020 मध्ये आम्ही यश आणि त्याचा मित्र, सहकारी प्रशांत यांच्यासोबत एक टीम बनवली आणि संपर्कासाठी आम्ही एक अनौपचारिक ग्रुप तयार केला होता. ‘वादळ येत आहे’ असं नाव त्या ग्रुपला देण्यात आलं होतं. हाच विश्वास त्याने आमच्यात रुजवला आहे. KGF 2 चं शूटिंग जेव्हा पूर्ण होईल आणि तो प्रदर्शित होईल तेव्हा त्याला इतका प्रतिसाद मिळेल हे कोणालाच माहीत नव्हतं”

“सध्या आम्ही एक टीम म्हणून दीर्घकालीन पार्टनरशिप्सकडे पाहतोय. अलीकडेच आम्ही एका पान मसाला ब्रँडची कोट्यवधींची ऑफर नाकारली. आम्ही कोणाशी संबंधित डील करतो याविषयी अत्यंत सावधगिरी बाळगणार आहोत. देशभरात असलेली त्याची लोकप्रियता पाहता त्याचे चाहते आणि फॉलोअर्सपर्यंत योग्य संदेश पोहोचवता येईल अशाच ब्रँडमध्ये आम्ही आमचा वेळ आणि मेहनत यांची गुंतवणूक करू इच्छितो. पान मसाला आणि त्यासारख्या इतर उत्पादनांचा लोकांच्या आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होतो आणि त्यांचा परिणाम जीवघेणा ठरू शकतो. यशने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे,” असं ते पुढे म्हणाले.

अक्षय कुमारचा माफीनामा-

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

नुकतीच अक्षय कुमारने तंबाखूची जाहिरात केली होती आणि त्यामुळेच त्याचे चाहते नाराज झाले होते. नेटकऱ्यांनी या जाहिरातीमुळे अक्षयला खूप ट्रोल केलं होतं. विरोधानंतर अक्षयने जाहिरातीतून माघार घेत चाहत्यांची माफी मागितली. त्याचसोबतच जाहिरातीतून मिळालेला पैसा हा चांगल्या कामासाठी खर्च करणार असल्याचं सांगितलं.

Follow Us
उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः DCM...
DCM Eknath Shinde | उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः एकनाथ शिंदे दोन वाजता... काय घडणार?
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोर...
Vidhaansabha Protest | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोरच्या घोषणांनी सरकारला घेरलं
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरेंचा बडा नेता शिंदेंकडून मैदानात
मोठी बातमी! ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरे गटाचा बडा नेता शिंदेंच्या सेनेकडून मैदानात
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट; तासभर झालेल्या चर्चेत असं काय घडलं?
रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...
Sanjay Raut Full Press | रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...; संजय राऊतांचा भाजपवर जिव्हारी लागणारा वार!
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं...
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं विलीनीकरण... नेमकं काय घडतंय?
टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
TET Paper Leak |  ठाणे पोलिसांची कारवाई; टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या
Vidhan Parishad | शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या नेत्यांची नावे...
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
ब्रेकिंग! शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले; वर्षा बंगल्यावर नेमकं काय शिजलं?