AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बोनी कपूर यांची लेक खुशी कपूर ‘या’ अभिनेत्याला करत आहे डेट? अखेर अत्यंत मोठा खुलासा

बोनी कपूर यांची लेक खुशी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नुकताच खुशी कपूर हिने बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. विशेष म्हणजे खुशी कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. खुशी कपूर चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ कायमच शेअर करते.

बोनी कपूर यांची लेक खुशी कपूर 'या' अभिनेत्याला करत आहे डेट? अखेर अत्यंत मोठा खुलासा
| Updated on: Jan 01, 2024 | 4:25 PM
Share

मुंबई : बोनी कपूर यांची छोटी लेक आणि बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिची बहीण खुशी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नुकताच खुशी कपूर हिने बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. विशेष म्हणजे शाहरूख खान याची लेक सुहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर यांनी एकाच चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. गेल्या काही दिवसांपासून खुशी कपूर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसतंय. विशेष म्हणजे खुशी कपूर आपल्या चाहत्यांसाठी सतत खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसतंय.

आर्चीज चित्रपटामधून खुशी कपूर हिने बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. हा चित्रपट 7 डिसेंबर 2023 रोजी रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला अजिबातच धमाका करण्यात यश मिळाले नाही. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात आले. नुकताच आता खुशी कपूर ही कॉफी विथ करण या शोमध्ये पोहचली. यावेळी धमाका करताना खुशी दिसली.

करण जोहर याने म्हटले की, खुशी तू वेदांग रैना याला डेट करत असल्याची एक चर्चा आहे. यावेळी करण जोहर याला धमाकेदार उत्तर देताना खुशी कपूर ही दिसली आहे. विशेष म्हणजे खुशी कपूर हिची हे उत्तर ऐकून सर्वजण हे चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळाले. अत्यंत खास स्टाईलने उत्तर देताना खुशी कपूर ही दिसली आहे.

खुशी म्हणाली की, ओम शांती ओमचा तो सीन तुम्हाला माहीत आहे का जिथे लोक फक्त ओम आणि मी फक्त चांगले मित्र होतो असे म्हणत होते?” खुशीचे हे बोलणे ऐकून सर्वचजण हैराण झाल्याचे बघायला मिळाले. आता हाच प्रोमो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. करण जोहर याच्या या शोमध्ये अनेक कलाकार येताना दिसत आहेत.

द आर्चीज चित्रपटानंतर एक चर्चा सतत रंगताना दिसत आहे की, खुशी कपूर आणि वेदांग रैना हे एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, यावर दोघांपैकी कोणीही काहीही भाष्य केले नाहीये. अनेकदा खुशी कपूर आणि वेदांग रैना हे एकसोबत स्पाॅट होताना दिसतात. रिपोर्टनुसार वेदांग रैना आणि खुशी कपूर एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, याबद्दल अजून काही खुलासा हा होऊ शकला नाहीये.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना