AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kiara Advani | लग्नाच्या फोटो, व्हिडीओवरून सिद्धार्थ-कियारामध्ये झाला होता वाद; अभिनेत्रीचा खुलासा

कियारा आणि सिद्धार्थने लग्नापूर्वी कधीच त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली नव्हती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कियाराने खुलासा केला की सिद्धार्थला त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करायचे नव्हते.

Kiara Advani | लग्नाच्या फोटो, व्हिडीओवरून सिद्धार्थ-कियारामध्ये झाला होता वाद; अभिनेत्रीचा खुलासा
Siddharth Malhotra and Kiara AdvaniImage Credit source: Twitter
| Updated on: Jul 12, 2023 | 1:47 PM
Share

मुंबई : कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत. याच वर्षी दोघं लग्नबंधनात अडकले आणि सध्या वैवाहिक आयुष्यात दोघं खुश आहेत. सिद्धार्थ आणि कियाराच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीलाही चाहत्यांकडून खूप पसंती मिळाली. हीच केमिस्ट्री अनेकदा ऑफस्क्रीनही पहायला मिळते. कियारा आणि सिद्धार्थने लग्नापूर्वी कधीच त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली नव्हती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कियाराने खुलासा केला की सिद्धार्थला त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करायचे नव्हते.

कियारा सध्या तिच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाने कमाईचा 100 कोटींचा आकडा पार केला. या चित्रपटाच्या यशानिमित्त ‘फिल्म कम्पॅनियन’ला दिलेल्या मुलाखतीत कियारा तिच्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. कियाराने या मुलाखतीत सांगितलं की तिने सोशल मीडियावर जे लग्नाचे फोटो पोस्ट केले होते त्यापैकी काही फोटो सिद्धार्थला पोस्ट करायची इच्छा नव्हती. विशेषकरून लग्नाचा व्हिडीओ त्याला सोशल मीडियावर पोस्ट करायचा नव्हता. कियाराने हेसुद्धा सांगितलं की त्या व्हिडीओला पोस्ट करण्यावरून बराच वाददेखील झाला होता. कारण सिद्धार्थला त्याच्या खासगी आयुष्याबद्दलच्या काही गोष्टी सोशल मीडियावर शेअर केलेल्या आवडत नाहीत.

सिद्धार्थ आणि कियाराने 7 फेब्रुवारी 2023 रोजी लग्नगाठ बांधली. जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. ‘आता आमची पर्मनंट बुकिंग झाली आहे. यापुढील प्रवासासाठी तुमचा आशीर्वाद आणि प्रेम द्या’, असं कॅप्शन देत दोघांनी लग्नाचे खास फोटो पोस्ट केले होते.

View this post on Instagram

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

सिद्धार्थ-कियाराची पहिली भेट ही ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटानिमित्त आयोजित केलेल्या एका पार्टीत झाली. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ‘शेरशाह’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांनाही खूप आवडली. 2010 मध्ये करण जोहरने त्याच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून सिद्धार्थला लाँच केलं. तर कियारा अडवाणीने 2014 मध्ये ‘फगली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हे दोघं त्यांच्या रिलेशनशिपविषयी कधीच माध्यमांसमोर व्यक्त झाले नाहीत. मात्र बॉलिवूडच्या विविध पार्ट्यांमध्ये किंवा सहलींवर जाताना दोघांना नेहमीच एकत्र पाहिलं गेलं.

कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनमध्ये कियारा पहिल्यांदाच तिच्या नात्याविषयी व्यक्त झाली होती. “आम्ही लस्ट स्टोरीजच्या रॅप-अप पार्टीमध्ये सहज बोलू लागलो होतो. तेव्हाच आम्ही पहिली भेट झाली होती. ती भेट अगदी सहज होती. मात्र तो दिवस मी कधीच विसरणार नाही”, असं ती म्हणाली होती.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा