
बी-टाउनची सुंदर अभिनेत्री कियारा अडवाणीने आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी प्रेग्नेंसीची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. हे जोडपे लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत. सिद्धार्थ आणि कियारा यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही गुडन्यूज दिली आहे.
हातात लहान बाळाचे मोजे अन् चाहत्यांना गुडन्यूज
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत या दोघांनी त्यांच्या हातात लहान बाळाचे मोजे धरले आहेत. या पोस्टवर या जोडप्यानं लिहिलं, ‘आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट लवकरच येईल.’ सिद्धार्थ आणि कियारानं ही पोस्ट शेअर करताच, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि चाहते कमेंट सेक्शनमध्ये अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर करत आहेत.
प्रेग्नेंसीमध्येही शूटींग करतेय कियारा
दरम्यान या गुडन्यूजनंतर कियारा पुन्हा तिच्या कामात व्यस्त झालेली पाहायला मिळत आहे. प्रेग्नेंसीची बातमी शेअर केल्यानंतर सर्वजण अभिनेत्रीचे अभिनंदन करताना दिसत आहेत. मात्र आता कियारा पुन्हा एकदा कामावर परतली आहे. कियारा प्रेग्नेंसीमध्येही तिचं शूटींग करताना दिसत आहे. तिचे सेटवरील काही फोटो व्हायरलही झाले आहेत. कियारा अडवाणीचे हे फोटो मुंबईतील शूट लोकेशनचे आहेत. खरंतर, प्रेग्नेंसीची घोषणा झाल्यानंतर कियारा पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.
फोटोंमध्ये कियाराचा लूक सिंपल पण फारच आकर्षक
या फोटोंमध्ये कियाराचा लूक सिंपल पण फारच आकर्षक वाटत आहे. तिने पांढरा शर्ट आणि शॉर्ट्स घातलेलं दिसत आहेत. डोळ्यांवर गॉगल, पायात फ्लॅट शूज आणि नो मेकअप लूकमध्ये कियारा फारच गोड दिसत होती. कियाराने पॅप्सना फोटोसाठी अनेक पोझ दिल्या. तसेच फोटो पाहून चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत, कियाराच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो दिसत असून तिच्या चेहऱ्यावर आईपणाचं सौंदर्यात खुलून दिसत असल्याच्या कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, कियारा अडवाणी शेवटची राम चरणसोबत ‘गेम चेंजर’ चित्रपटात दिसली होती. सध्या तिच्याकडे अनेक मोठे चित्रपट आहेत. त्यांच्या शुटींगमध्येच ती सध्या व्यस्त असल्याचं दिसून येत आहे.