AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कशी आहे कियारा अडवाणीची सासुरवाडी? सासरे माजी नौदल अधिकारी, तर सासूचे फोटो पाहिलेत का?

या लग्नाला 100 ते 125 पाहुणेच हजर राहणार असल्याचं कळतंय. या लग्नाविषयीची प्रत्येक लहानसहान अपडेट समोर येत असतानाच कियाराची सासुरवाडी कशी आहे, याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

कशी आहे कियारा अडवाणीची सासुरवाडी? सासरे माजी नौदल अधिकारी, तर सासूचे फोटो पाहिलेत का?
Sidharth and KiaraImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 03, 2023 | 4:53 PM
Share

मुंबई: बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. येत्या 6 फेब्रुवारी रोजी हा लग्नसोहळा पार पडणार आहे. सिद्धार्थ आणि कियाराने डेस्टिनेशन वेडिंगसाठी जैसलमेरची निवड केली आहे. जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये अत्यंत शाही पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडणार आहे. या लग्नाला 100 ते 125 पाहुणेच हजर राहणार असल्याचं कळतंय. या लग्नाविषयीची प्रत्येक लहानसहान अपडेट समोर येत असतानाच कियाराची सासुरवाडी कशी आहे, याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

सिद्धार्थ पंजाबी आहे आणि तो मूळचा दिल्लीचा आहे. त्याचं शालेय शिक्षणसुद्धा दिल्लीतूनच पूर्ण झालं आहे. सिद्धार्थच्या वडिलांचं नाव सनी माँटी मल्होत्रा आहे, जे माजी नौदल अधिकारी आहेत. तर त्याची आई रिमा मल्होत्रा या गृहिणी आहेत. सिद्धार्थला एक मोठा भाऊसुद्धा आहे. त्याचं नाव हर्षद मल्होत्रा असून तो बँकर आहे. हर्षलने पूर्णिमा मल्होत्राशी लग्न केलं आहे. या दोघांना एक मुलगा असून त्याचं नाव अधिराज मल्होत्रा असं आहे.

सिद्धार्थ आणि कियारा हे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ‘शेरशाह’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली.

‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटाच्या लाँचनिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत पहिल्यांदा सिद्धार्थ आणि कियाराची भेट झाली. या भेटीत दोघांची चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये सिद्धार्थने अप्रत्यक्षपणे त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. आता लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे.

Follow Us
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...