AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरी एकटी असताना अभिनेत्रीने सेल्फीमध्ये पाहिला ‘भूत’? फोटो पाहून नेटकरी म्हणाले ‘हनुमान चालीसा वाच..’

सोशल मीडियावर किम कर्दाशियनच्या फोटो आणि व्हिडीओंना चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते. किमला फॉलो करणाऱ्या फॅन्सची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. किमने पोस्ट शेअर करताच त्यावर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा अक्षरशः पाऊस पडतो.

घरी एकटी असताना अभिनेत्रीने सेल्फीमध्ये पाहिला 'भूत'? फोटो पाहून नेटकरी म्हणाले 'हनुमान चालीसा वाच..'
Kim KardashianImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 11, 2023 | 9:19 AM
Share

अमेरिका : अमेरिकन रिॲलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशियन नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर ती सतत बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. मात्र नुकताच तिने असा फोटो पोस्ट केला आहे, जो पाहून चाहतेसुद्धा थक्क झाले आहेत. किम कर्दाशियनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा सेल्फी पोस्ट केला आहे. मात्र या सेल्फीमध्ये किमच्या मागे खिडकीवर एका महिलेची सावली पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे त्यावेळी किम तिच्या घरात एकटीच होती. खुद्द तिनेच कॅप्शनमध्ये याची माहिती दिली आहे. त्यामुळे पडद्यावर दिसणारी ती सावली नेमकी कोणाची असा प्रश्न किमसोबतच नेटकऱ्यांना पडला आहे.

किम कर्दाशियनने सेल्फी पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘हा फोटो मी गेल्या आठवड्यात क्लिक केला होता, जेव्हा मी घरात एकटीच होते आणि आता जेव्हा मी पुन्हा तो फोटो पाहिला तर मागे खिडकीवरील महिलेच्या सावलीला पाहून माझी घाबरगुंडीच उडाली आहे.’ आपल्या फोनमधील फोटो स्क्रोल करताना किमने सहज स्वत:चा हा सेल्फी पाहिला आणि त्यावेळी तिला ती सावली दिसली. तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘ही नक्कीच तिची पर्सनल असिस्टंट असेल. किमला स्वत:चा हा नो मेकअप लूक पोस्ट करायचा होता, म्हणून ती असं म्हणतेय’, असं एकाने लिहिलं. तर ‘देवाचं नाव घेत जा’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘हनुमान चालीसा किंवा बजरंग बाण वाच’, अशीही भन्नाट कमेंट नेटकऱ्यांनी केली आहे. काहींनी तिला घरातील सर्व खिडक्या आणि दरवाजे उघडून प्रार्थना करण्याचा सल्ला दिला.

सोशल मीडियावर किम कर्दाशियनच्या फोटो आणि व्हिडीओंना चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते. किमला फॉलो करणाऱ्या फॅन्सची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. किमने पोस्ट शेअर करताच त्यावर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा अक्षरशः पाऊस पडतो. ती तिच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. किम कर्दाशियन सध्या तिच्या चार मुलांसह लॉस एंजिलिसमध्ये राहते. तर तिचा पती आणि रॅपर कान्ये वेस्ट हा त्याच्या फार्महाऊसवर राहतो. किम-कान्येच्या लग्नाला सहा वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. 2014 मध्ये दोघं विवाहबंधनात अडकले होते. 2021 मध्ये तिने घटस्फोटासाठी अर्ज केला होता.

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.