Video | कॅन्सरशी झुंज देणाऱ्या किरण खेर यांनी मानले चाहत्यांचे आभार, लेकालाही दिला ‘हा’ खास सल्ला!

अभिनेता आणि राजकारणी किरण खेर (Kirron Kher) सध्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. किरण खेर यांचा मुलगा सिकंदरने चाहत्यांची त्याच्या कुटुंबियांशी सोशल मीडियावर भेट घडवून आणली. यासह त्याने आईच्या तब्येतीची अपडेटही चाहत्यांना दिली.

Video | कॅन्सरशी झुंज देणाऱ्या किरण खेर यांनी मानले चाहत्यांचे आभार, लेकालाही दिला ‘हा’ खास सल्ला!
किरण खेर

मुंबई : अभिनेता आणि राजकारणी किरण खेर (Kirron Kher) सध्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. किरण खेर यांचा मुलगा सिकंदरने चाहत्यांची त्याच्या कुटुंबियांशी सोशल मीडियावर भेट घडवून आणली. यासह त्याने आईच्या तब्येतीची अपडेटही चाहत्यांना दिली. या व्हिडीओमध्ये सिकंदर (Sikandar Kher)  त्याची आई किरण आणि वडील अनुपम खेर यांच्याशी चर्चा करताना दिसत आहे (Kirron Kher son sikandar kher share her latest video on social media).

सिकंदरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये किरण खेर यांनी चाहत्यांना प्रेम व शुभेच्छा दिल्याबद्दल आभार मानले आहेत. व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले की, ‘खेर साहब आणि किरण मॅम. हा खूप क्युट आणि छोटासा व्हिडीओ आहे. माझ्या कुटूंबाकडून नमस्कार. माझ्या आईसाठी आपण जे प्रेम पाठवले त्याबद्दल सर्वांचे आभार.’

व्हिडीओच्या सुरुवातीस सिकंदर म्हणतो की, तो आपल्या कुटुंबासमवेत बसला आहे. आपण श्रीमती खेर यांच्या पायांची झलक पाहू शकता. त्यानंतर तो कॅमेरा त्याच्या आईच्या पायाकडे फिरवतो आणि म्हणतो की आपण आपल्या पायानेच प्रत्येकाला हाय म्हणा. या दरम्यान किरण खेर पलंगावर विश्रांती घेताना दिसत आहे आणि आपल्या गोड आवाजात सर्वांना हाय म्हणतात.

पाहा सिकंदर खेरचा व्हिडीओ :

किरण खेर यांनी मानले चाहत्यांचे आभार

जेव्हा सिकंदर व्हिडीओ बंद करण्यास सुरवात करतो, तेव्हा किरण खेर त्याला व्हिडीओमध्ये आपला चेहरा दाखवण्यास सांगतात. तेव्हा तो कॅमेरा घेऊन आईकडे जातो. त्यानंतर किरण खेर सर्वांना हॅलो म्हणतात. तर, चाहत्यांच्या सर्व प्रेम आणि शुभेच्छांबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. याच वेळी त्यांनी लेकाला अर्थात सिकंदर खेर याला लग्न करण्याचा सल्ला देखील दिला आहे (Kirron Kher son sikandar kher share her latest video on social media).

अनुपम खेर यांची एक झलक

सिकंदर आपल्या व्हिडीओमध्ये आई किरणसमवेत वडील अनुपम खेर यांचीही एक झलक दाखवतो. यावेळी अनुपम खेर सर्वांना हाय म्हणतात आणि म्हणतात की, मी सूप पित आहे. तसेच, सूपमध्ये कॅमेरा टाकू नकोस, असे ते सिकंदरला म्हणतात.

अनुपम खेर यांनी दिली हेल्थ अपडेट

काही काळापूर्वी अनुपम खेर यांनी चाहत्यांना त्यांची पत्नी किरण खेर यांच्या प्रकृतीविषयी अपडेट दिली होती. त्यांनी एका मुलाखतीत किरण खेरचे हेल्थ अपडेट दिले होते. ते म्हणाले होते की, किरण यांची तब्येत आता बरी आहे, पण तिचा उपचार जरा कठीण आहे. ती खूप सकारात्मक राहते. केमोथेरपीचे परिणाम तिच्या शरीरावर दिसू लागले आहेत.

मृत्यूची अफवा

किरण खेर काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासमवेत कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या अफवा पसरू लागल्या होत्या. यानंतर त्या एकदम ठीक असून, या केवळ अफवा असल्याचे अनुपम खेर यांनी स्पष्ट केले होते.

(Kirron Kher son sikandar kher share her latest video on social media)

हेही वाचा :

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण, नोकरांपाठोपाठ बॉडीगार्डही साक्षीदार होणार

आमीरच्या सांगण्यावरून ‘त्या’ सीनसाठी ‘3 Idiots’नी खरोखरच केलं ‘मद्यपान’, अभिनेता शर्मन जोशीने सांगितला किस्सा!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI