महिलांच्या सौंदर्याचं कौतुक करणार गाणं, 48 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आजही गुणगुणतात लोक

48 वर्षांपूर्वीचं सर्वात रोमँटिक गाणं, ज्यामध्ये मुलींच्या सौंदर्याचं करण्यात आलंय प्रचंड कौतुक. लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे आजही हे गाणं अनेकजण गुणगुणतात.

महिलांच्या सौंदर्याचं कौतुक करणार गाणं, 48 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आजही गुणगुणतात लोक
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 10, 2026 | 9:08 PM

हिंदी चित्रपटसृष्टीत किशोर कुमार आणि लता मंगेशकर या दोन दिग्गज गायकांच्या आवाजाने अनेक अजरामर गाणी प्रेक्षकांना दिली. या दोघांनी एकत्र गायलेली गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यापैकीच एक रोमँटिक गाणं म्हणजे ‘आपकी आँखों में कुछ महके हुए से ख्वाब हैं’. 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘घर’ या चित्रपटातील हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यान घडलेला एक रंजक किस्सा विशेष चर्चेत आहे.

‘घर’ चित्रपटात रेखा आणि विनोद मेहरा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातील ‘आपकी आँखों में कुछ महके हुए से ख्वाब हैं’ हे गाणं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलं होतं. गुलजार यांनी या गाण्याचे बोल लिहिले होते तर संगीतकार राहुल देव बर्मन म्हणजेच पंचमदा यांनी संगीत दिलं होतं.

Loading...

गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यान किशोर कुमार गाण्यात इतके रमले होते की, त्यांनी एका ओळीतील ‘जब हिले’ या शब्दांऐवजी ‘लब हिले’ असे शब्द गायल्याचं सांगितलं जातं. मात्र, गाण्याच्या प्रवाहात ही चूक लक्षात आल्यानंतरही रेकॉर्डिंग तात्काळ थांबवण्यात आलं नाही. या प्रसंगात लता मंगेशकर यांच्या प्रतिक्रियेची विशेष चर्चा केली जाते.

लता मंगेशकर यांच्या स्मितहास्याने जिंकली मनं

या किस्स्यानुसार, पंचमदा आणि गीतकार गुलजार यांना लता मंगेशकर शब्दांच्या अचूकतेबाबत किती काटेकोर होत्या, याची जाणीव होती. त्यामुळे गाण्याच्या ओळीतील बदलावर त्यांची काय प्रतिक्रिया असेल, याबाबत उत्सुकता होती. मात्र, लता मंगेशकर यांनी गाणं सुरू ठेवत आपला भाग गायला आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हलकंसं स्मितहास्य सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

हे स्मितहास्य गाण्याचा नियोजित भाग नव्हतं, असं या किस्स्यात सांगितलं जातं. मात्र, पंचमदा यांना लतादीदींचा हा सहजसुंदर अंदाज आवडल्यामुळे त्यांनी पुन्हा रिटेक घेण्याचा आग्रह धरला नाही, अशी या घटनेची आठवण सांगितली जाते. या गाण्याला आता जवळपास 48 वर्षं झाली आहेत. तरीही किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजातील या गाण्याची लोकप्रियता कायम आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us