एकेकाळी बॉलिवूडमध्ये गाजली होती माधुरी-संजयची प्रेम कहाणी, ‘त्या’ घटनेमुळे तुटले नाते!

दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले होते. इंडस्ट्रीमध्ये दोघांच्या नात्याची चर्चा देखील सुरु झाली होती. मात्र, संजय दत्तच्या आयुष्यात अशी एक घटना घडली, ज्यामुळे माधुरी त्याच्या पासून दूर झालीच पण तो कायद्याच्या कचाट्यातही अडकला.

एकेकाळी बॉलिवूडमध्ये गाजली होती माधुरी-संजयची प्रेम कहाणी, ‘त्या’ घटनेमुळे तुटले नाते!
संजय दत्त-माधुरी दीक्षित
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 11:14 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये नाती जुळणं आणि ती एका फटक्यात मोडणं ही गोष्ट काही नवी नाही. मात्र, बॉलिवूडच्या 90च्या दशकांत अशा अनेक प्रेमकथा समोर आल्या, ज्या जोड्या नंतर विभक्त झाल्याने त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. अशीच एक जोडी होती संजय दत्त (Sanjay Dutt) आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांची. 90च्या दशकात दोन्ही कलाकार आपल्या कारकिर्दीत यशाच्या शिखरावर होते. ‘साजन’ या चित्रपटात या दोघांनी एकत्र काम केलं. याच दरम्यान दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले होते (Know the reason why sanjay dutt and madhuri dixit broke up their relation).

याच काळात दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले होते. इंडस्ट्रीमध्ये दोघांच्या नात्याची चर्चा देखील सुरु झाली होती. मात्र, संजय दत्तच्या आयुष्यात अशी एक घटना घडली, ज्यामुळे माधुरी त्याच्या पासून दूर झालीच पण तो कायद्याच्या कचाट्यातही अडकला.

‘साजन’साठीं अशी झाली निवड

‘साजन’ या चित्रपटातही माधुरी आणि संजयची जोडी झळकली होती. मात्र, या चित्रपटासाठी हे दोघेही निर्मात्यांची पहिली पसंती नव्हते. 1991मध्ये दिग्दर्शक लॉरेन्स डिसुझा यांनी त्यांच्या आगामी ‘साजन’ या चित्रपटासाठी कलाकार शोधण्यास सुरुवात केली होती. या चित्रपटातील मुख्य पात्रासाठी अर्थात नायकासाठी त्यांना आमीर खानची निवड करायची होती. मात्र, आमीर खानने नकार दिल्यानंतर हा चित्रपट संजय दत्त याच्या हाती आला. तर, नायिका म्हणून अभिनेत्री आयेशा झुल्का हिला पहिली पसंती देण्यात आली होती. मात्र, कदाचित हा चित्रपट माधुरीच्याच नशिबी लिहिला होता. चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होण्यापूर्वी आयेशा खूप आजारी पडली, ज्यामुळे तिने या चित्रपटातून माघार घेतली. आणि तिच्या जागी माधुरी दीक्षितची वर्णी लागली.

अशी सुरु झाली प्रेमकहाणी…

या चित्रपटाच्या सेटवर दोघे एकमेकांच्या अधिक जवळ आले. चित्रपटाचे चित्रीकरण एका मोकळ्या जागी सुरु होते. तिथे संजय आणि माधुरीला एकमेकांसाठी बराच वेळ मिळाला होता. फावला वेळ दोघे एकमेकांसोबतच घालवत होते. या चित्रपटात त्यांची केमिस्ट्रीची भट्टी देखील चांगलीच जमून आली होती. दोघांमध्ये काही तरी सुरु असल्याची चर्चा एव्हाना सुरु झाली होती. अर्थात ही चर्चा संजय दत्तच्या घरापर्यंत पोहोचली (Know the reason why sanjay dutt and madhuri dixit broke up their relation).

कुटुंबाचा विरोध

संजय आणि माधुरीच्या नात्याला दत्त कुटुंबीयांनी कडाडून विरोध केला होता. याचे कारण होते संजय दत्तचे लग्न. होय, या काळात संजय दत्त याचे लग्न झाले होते. माधुरीच्या घरून देखील या नात्याला विरोध झाला होता. मात्र, दोघेही चोरून गुपचूप भेटत राहिले. या दरम्यान संजयचा ‘खलनायक’ प्रदर्शित झाला आणि त्याने संजयला सातव्या आस्मानावर नेऊन ठेवले. त्यानंतर तो आगामी चित्रपटासाठी परदेशी निघून गेला. याचवेळी बहिण प्रियाने संजयला एक वाईट बातमी सांगितली. ही बातमी ऐकून संजय दत्त मुंबईत परतला.

नात्यात आली दरी…

संजय दत्त मायदेशी परतला तेव्हा त्याच्या स्वागतासाठी कुटुंबासह पोलीस देखील हजर होते. संजय दत्तवर टाडाअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. इतकेच नाही तर त्याला अटकही करण्यात आली. यामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वच हादरले होते. संजय दत्तच्या मागे लागलेल्या या पोलीस ससेमीऱ्यामुळे माधुरीला देखील धक्का बसला. याच घटनेनंतर माधुरी संजयपासून दूर झाली. त्यानंतर तिने पुन्हा कधीच मागे वळून पहिले नाही. त्यानंतर माधुरीने श्रीराम नेने यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आणि संसारात रमली. तर, संजय दत्त देखील आपल्या वाट्याची शिक्षा भोगून पुन्हा मनोरंजन विश्वात परतला आहे.

(Know the reason why sanjay dutt and madhuri dixit broke up their relation)

हेही वाचा :

सेटवर गाण्याचं पेमेंट घ्यायला गेले, निळूभाऊंनी थेट सिनेमात कामच दिलं; वाचा, पुणेकरांचा अफलातून किस्सा

कोरोनामुळे निक्की तंबोलीने गमावला भाऊ, सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहित शेअर केले दुःख

Non Stop LIVE Update
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.