AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Koffee With Karan : ‘कॉफी विथ करण 9’ मध्ये दिसणार तगडी स्टारकास्ट ! व्हायरल गेस्ट लिस्टने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरचा 'कॉफी विथ करण 9' शो नव्या सीझनसह परत येत आहे. सोशल मीडियावर शोची कथित गेस्ट लिस्ट व्हायरल झाली आहे, ज्यात अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींची नावे आहेत.

Koffee With Karan : ‘कॉफी विथ करण 9’ मध्ये दिसणार तगडी स्टारकास्ट ! व्हायरल गेस्ट लिस्टने वाढवली चाहत्यांची उत्सुकता
यंदा कॉफी विथ करणमध्ये कोण दिसणार ?Image Credit source: social media
| Updated on: Aug 21, 2026 | 3:41 PM
Share

प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan ) हा लोकप्रिय सेलिब्रिटी टॉक शो पुन्हा एकदा नव्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. शोच्या 9व्या सीझनची चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्सुकता असून, यंदा करणच्या काउचवर कोणते सेलिब्रिटी दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, सोशल मीडियावर ‘कॉफी विथ करण 9’ची कथित गेस्ट लिस्ट व्हायरल होत आहे. या लिस्टमध्ये बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय कलाकार आणि नव्या जोड्यांची नावं दिसत आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये या सीझनबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे. इंटरनेवरही या लिस्टबाबत जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

व्हायरल झाली गेस्ट लिस्ट

व्हायरल लिस्टनुसार, ‘सैयारा’मधून चर्चेत आलेला अहान पांडे आणि अनीत पड्डा ही जोडी पहिल्यांदाच ‘कॉफी विथ करण’मध्ये दिसू शकते. त्यांच्यासोबतच सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ही लोकप्रिय जोडीही शोमध्ये सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकतेच लग्नबंधनात अडकलेले विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांची जोडीदेखील करणच्या काउचवर दिसू शकते. या एपिसोडमध्ये त्यांच्या नात्याबद्दल तसेच वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.

कॉफी विथ करणमध्ये दिसणार समय रैनाचा जलवा ?

यंदाच्या सीझनमध्ये तरुण कलाकारांसोबतच बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांचीही उपस्थिती पाहायला मिळू शकते. व्हायरल लिस्टमध्ये आमिर खान, सैफ अली खान, फरहान अख्तर आणि अक्षय खन्ना यांच्या नावांची चर्चा आहे. याशिवाय करीना कपूर खान, काजोल आणि जया बच्चन यांचा स्पेशल एपिसोडही होण्याती शक्यता वर्तवली जात आहे. स्टँडअप कॉमेडियन समय रैना आणि फिल्ममेकर फराह खान यांची नावेही या कथित व्हायरल लिस्टमध्ये आहेत.

नव्या अंदाजात येणार कॉफी विथ करण 9

‘कॉफी विथ करण 9’ हा शो दिवाळीच्या खास मुहूर्तावर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो, असे संकेत करण जोहरने नुकतेच दिले होते. मागील सीझनला मिळालेल्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन यंदा शोच्या फॉरमॅटमध्ये आणि रॅपिड फायर राउंडमध्ये काही बदल पाहायला मिळू शकतो. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या गेस्ट लिस्टला अद्याप करण जोहर किंवा शोच्या निर्मात्यांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे या सेलिब्रिटींची नावे सध्या केवळ चर्चेपुरतीच मर्यादित आहेत.

Follow Us
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपकेंचं मोठं विधान
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपके यांचं सर्वात मोठं विधान
CJP जखमी विद्यार्थ्यासाठी राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या...
CJP च्या जखमी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; जोपर्यंत...
राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार...
एकच खळबळ! राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार... व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये नेमकं काय?
तुम्ही पाहिलं का? राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी रोहित पवारांकडून...
तुम्ही पाहिलं का? राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी रोहित पवारांकडून जोरदार बॅनरबाजी
श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; मराठी माणूस म्हणजे फक्त..
श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; मराठी माणूस म्हणजे फक्त..
अजित पवारांच्या अपघाताबाबतचा अजब दावा केल्यानंतर इस्कॉन...
अजित पवारांच्या अपघाताबाबतचा अजब दावा केल्यानंतर...  इस्कॉनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; 'शिवतीर्था'वरील बैठकीत...
संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; 'शिवतीर्था'वरील बैठकीत... नेमकं काय घडलं?
आम्ही भारतीयच, आम्हाला चायनीज नका म्हणू; अरुणाचल प्रदेशमधील चिमुकली...
आम्ही भारतीयच, आम्हाला चायनीज नका म्हणू; अरुणाचल प्रदेशमधील चिमुकलीचा भावनिक व्हिडीओ व्हायरल
दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी बैठक
दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी उच्चस्तरीय बैठक, देशाच्या प्रशासकीय यंत्रणेला...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट अमित शहांवर हल्लाबोल, गुजरातमधील...