AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुख खान होता चेन स्मोकर, ‘या’ अभिनेत्याकडून मोठा खुलासा

Shahrukh Khan | शाहरुख कधीकाळी होता चेन स्मोकर, एकावेळी प्यायचा इतक्या सिगारेट..., किंग खानच्या को-स्टारकडून मोठा खुलासा..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान याची चर्चा... अनेक वर्षांनंतर मोठं सत्य समोर...

शाहरुख खान होता चेन स्मोकर, 'या' अभिनेत्याकडून मोठा खुलासा
| Updated on: May 20, 2024 | 1:48 PM
Share

बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान याला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाहीतर, साता समुद्रापार देखील आहे. अनेक दमदार भूमिकांमुळे अभिनेता प्रसिद्धीझोतात आहे. पण झगमगत्या विश्वात एक असा अभिनेता आहे, ज्या अनेक सिनेमांमध्ये खलनायकाच्या भूमिकेला न्याय दिला. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाहीतर, अभिनेता प्रदीप रावत आहे. शाहरुख आणि प्रदीप यांनी ‘कोयला’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली.

सिनेमात अभिनेत्री माधुरी दीक्षित देखील महत्त्वाच्या भूमिकेत होती. तर एका मुलाखतीत प्रदीप याने किंग खान याच्याबद्दल फार मोठा खुलासा केला आहे. प्रदीप म्हणाला, ‘दिग्दर्शक राकेश रोशन यांचं मन फार मोठं आहे. शुटिंगच्या सेटवर कोणताच दिवस पार्टी शिवाय गेला नाही. ते सर्वांना कॉल करुन बोलवायचे. जेथे जेवण आणि इतर गोष्टी देखील असायच्या…’

पुढे प्रदीप याने किंग खानबद्दल मोठा खुलासा केला. ‘सिनेमाच्या शुटिंग दरम्यान मी कधीच शाहरुखच्या जवळ गेलो नाही. पण तो एक उत्तम माणूस आहे. पण मला एक गोष्ट आठवते की मी कोणत्याही अभिनेत्याला इतक्या सिगारेट ओढताना पाहिले नव्हतं.

‘शाहरुख खान एक सिगारेट संपली की लगेच दुसरी पेटवायचा. तो चेन स्मोकर होता. पण सिनेमाप्रती त्याचे समर्पण काही कमी नव्हते….’ असं देखील प्रदीप म्हणाला. सांगायचं झालं तर अभिनेका कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.

सांगायचं झालं तर, नुकताच शाहरुख खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये अभिनेता आयपीएल सामन्या दरम्यान सिगारेट ओढताना दिसला. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक जण त्याला चेन स्मोकर म्हणू लागले…

शाहरुख खान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता ‘किंग’ सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘किंग’ सिनेमात शाहरुख खान लेक सुहाना खान हिच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात झाल्याची देखील माहिती मिळत आहे.

किंग याने गेल्या वर्षी देखील हीट सिनेमे बॉलिवूडला दिले. ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ सिनेमामुळे बॉक्स ऑफिसवर चाहत्यांची गर्दी जमली. तिन्ही सिनेमांनी फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील नवीन विक्रम रचले. आता चाहते अभिनेत्याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे.

Follow Us
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड