Kriti Sanon: करोडपती उद्योजकाला गुपचूप डेट करतेय क्रिती, ‘त्या’ खासगी फोटोंमुळे पोलखोल
Kriti Sanon Love Life: कोण आहे क्रितीचा बॉयफ्रेंड? परदेशातील करोडपती उद्योजकाला डेट करतेय अभिनेत्री, 'त्या' खासगी फोटोंमुळे सत्य समोर, करणार लग्न?, सध्या सर्वत्र क्रिती सनॉन आणि अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा...

‘क्रू’, ‘आदिपुरूष’, ‘मीमी’,’गणपत’, ‘लुका छिपी’, ‘दिलवाले’ अशा अनेक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री क्रिती सनॉन हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. क्रिती हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. त्यामुळे क्रिती हिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. आता अभिनेत्रीचा एका करोडपती पुरुषासोबत फोटो व्हायरल होत आहे. खासगी फोटो व्हायरल झाल्यामुळे क्रिती हिच्या ‘लव्हलाईफ’च्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
रिपोर्टनुसार, अभिनेत्री क्रिती सनॉन करोडपती उद्योजक कबीर बहिया याला डेट करत आहे. सोशल मीडियावर क्रिती आणि कबीर यांचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये क्रिती आणि कबीर एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. एवढंच नाही तर, कबीर बहिया याने सोशल मीडियावर एक खास फोटो देखील पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र कबीर – क्रिती यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
क्रिती – कबीर यांचे व्हायरल फोटो पाहिल्यानंतर दोघे एकमेकांना गुपचूप डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. पण दोघांनी देखील अधिकृतपणे नात्याचा स्वीकार केलेला नाही. याआधी 2024 वर्षाच्या सुरुवातीला देखील क्रिती, कबीर याच्यासोबत पार्टी करताना दिसली. तेव्हा देखील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

क्रिती हिच्यासोबत नावाची चर्चा रंगू लागल्यानंतर कबीर कोण आहे आणि काय करतो? हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे. कबीर बहिया हा एक उद्योजक आहे. कबीर लंडन याठिकाणी राहातो. कबीर याचे वडील कुलजिंदर बहिया यूके येथील ट्रॅव्हल एजेंसी Southall Travel कंपनीचे मालक आहेत.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त क्रिती – कबीर यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील दोघांची जोडी आवडली आहे. त्यामुळे क्रिती – कबीर लग्न करतील का? अशी चर्चा देखील चाहत्यांमध्ये जोर धरत आहे.
नुकताच क्रिती सनॉन हिचा वाढदिवस झाला. म्हणून कबीर याच्यासोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी अभिनेत्री परदेशात फिरण्यासाठी गेली होती… अशी देखील चर्चा जोर धरत आहे. सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर क्रिती हिने एकही फोटो पोस्ट केलेला नाही. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
