या गाण्यातून अभिनेत्री प्रियकराला विचारते 6 प्रश्न, गाणं इतकं सुंदर की ऐकताच मनाला मिळतो सुकून

कुमार सानू आणि अल्का याग्निक यांच्या आवाजातील प्रचंड सुपरहिट गाणं, जे गेल्या 33 वर्षांपासून आहे लोकप्रिय. ज्यात अभिनेत्री आपल्या प्रियकराला गाण्यातून विचारते 6 प्रश्न.

या गाण्यातून अभिनेत्री प्रियकराला विचारते 6 प्रश्न, गाणं इतकं सुंदर की ऐकताच मनाला मिळतो सुकून
Kumar Sanu
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 29, 2026 | 7:15 PM

90 च्या दशकातील अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अभिनेता राहुल रॉयने आपल्या करिअरमध्ये मोजकेच चित्रपट केले असले, तरी त्यातील काही गाणी आणि त्याचा अंदाज आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. असंच एक रोमँटिक गाणं म्हणजे ‘बादलों में छुप रहा है चांद क्यों?’ या गाण्यात राहुल रॉय आणि पूजा भट्ट यांची सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळाली होती.

हे गाणं 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फिर तेरी याद आई’ या चित्रपटातील आहे. या गाण्याचे बोल प्रसिद्ध शायर कतील शिफाई यांनी लिहिले होते, तर संगीत अनु मलिक यांनी दिले होते. कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या मधुर आवाजाने या गाण्याला आणखी खास बनवलं.

Loading...

गाण्यातून अभिनेत्री प्रियकराला विचारते प्रश्न

गाण्यात अभिनेत्री आपल्या प्रियकराला एकामागून एक प्रश्न विचारताना दिसते. त्यावर नायक आपल्या खास अंदाजात तिच्या सौंदर्याचं कौतुक करताना दिसतो. कतील शिफाई यांच्या रोमँटिक शब्दांना कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजाची साथ मिळाल्याने हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं.

राहुल रॉयने 1990 मध्ये ‘आशिकी’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अनु अग्रवाल मुख्य भूमिकेत होती. ‘आशिकी’मुळे राहुल रॉयला मोठी लोकप्रियता मिळाली आणि त्याची ओळख एका रोमँटिक हिरो म्हणून निर्माण झाली.

90 च्या दशकातील सर्वात सुपरहिट गाणं

अभिनयासोबतच राहुल रॉयच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘बिग बॉस’चा पहिला सीझन. 2006 मध्ये तो या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला आणि विजेता ठरला. त्यामुळे चित्रपटांव्यतिरिक्त छोट्या पडद्यावरही त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली.

आजही 90 च्या दशकातील रोमँटिक गाण्यांची चर्चा झाली की ‘बादलों में छुप रहा है चांद क्यों?’ हे गाणं आवर्जून आठवलं जातं. राहुल रॉय आणि पूजा भट्ट यांची पडद्यावरील केमिस्ट्री, कतील शिफाई यांचे शब्द आणि कुमार सानू-अलका याज्ञिक यांचा आवाज यामुळे या गाण्याची जादू आजही कायम आहे. आजही चाहते हे गाणं वेळ काढून ऐकताना दिसतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us