AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी जिथे 10 वर्षांपासून राहत नाही तिथे..’; कुणाल कामराचा मुंबई पोलिसांना टोमणा

सोमवारी मुंबई पोलीस कॉमेडियन कुणाल कामराच्या मुंबईतल्या घरी पाहणीसाठी गेले होते. त्यानंतर त्याने एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहित पोलिसांना टोला लगावला आहे. कुणाल गेल्या दहा वर्षांपासून त्या घरात राहत नाही.

'मी जिथे 10 वर्षांपासून राहत नाही तिथे..'; कुणाल कामराचा मुंबई पोलिसांना टोमणा
कॉमेडियन कुणाल कामरा
| Updated on: Apr 01, 2025 | 9:44 AM
Share

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर करणारा कॉमेडियन कुणाल कामराच्या माहीम इथल्या घरी सोमवारी मुंबई पोलिसांचं पथक गेलं होतं. पोलिसांनी कामराला सोमवारी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले होते. पण तो अनुपस्थित राहिला होता. त्यामुळे पोलीस पथक सोमवारी कामराच्या घरी पाहणी करण्यासाठी गेलं होतं. या पाहणीवरून कुणालने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून त्याने अधिकाऱ्यांवर वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय केल्याबद्दल जोरदार टीका केली. कामराने किमान दहा वर्षांपासून त्या पत्त्यावर राहत नसल्याचं सांगून तामिळनाडूतील त्याच्या सध्याच्या घराच्या टेरेसवरून स्वत:चा एक फोटो शेअर केला.

“मी गेल्या दहा वर्षांपासून जिथे राहत नाही अशा पत्त्यावर जाणं म्हणजे तुमचा वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय आहे”, असं कामराने लिहिलंय. या प्रकारानंतर त्याने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे. कामराविरोधात खार पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. त्याला मुंबई पोलिसांनी दुसरं समन्स पाठवलं होतं. त्यात त्याला सोमवारी खार पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. पण तो अनुपस्थित राहिल्यामुळे पोलीस पथकाने माहीम इथल्या त्याच्या वडिलांच्या घरी जाऊन पाहणी केली. यापूर्वी याच ठिकाणी पोलिसांनी दोन समन्स बजावले होते.

याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयात शुक्रवारी कामराने अंतरिम अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावेळी न्यायालयाने कामराला अंतरिम दिलासा दिला होता. कामराविरोधात खार पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. त्यातील तीन गुन्हे नाशिक ग्रामीण, जळगाव आणि नाशिक (नांदगाव) इथून वर्ग करण्यात आले आहेत. मनमाड इथल्या शिवसेना (शिंदे) शहर प्रमुख मयूर बोरसे यांच्या तक्रारीवरून मनमाड पोलिसांनीही कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल केला होता. याशिवाय जळगावचे शिवसेना (शिंदे) शहर प्रमुख संजय भुजबळ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक नांदगाव इथल्या सुनील शंकर जाधव यांच्या तक्रारीप्रकरणी दाखल गुन्हाही खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. यासह शिवसेना नेते मुरजी पटेल यांच्या तक्रारीवरून खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Follow Us
बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी....
Shaina NC : बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी यांनी मागितली महाराष्ट्राची माफी
पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; दमदाटीचा व्हिडिओ..
Congress : पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी दमदाटीचा व्हिडिओ व्हायरल
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रा...
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रेच्या तयारीचा घेतला आढावा
न्यायालयाचा आदेश तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा
kolhapur Balumama Devasthan : न्यायालयाचा आदेश आणि SIT ची मनाई तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा चर्चेत
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा BJP..
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा भाजपमध्ये प्रवेश
मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमान
Sanjay Nirupam : मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमानावरून संजय निरुपम आक्रमक
दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना
Dadar : दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना वेग!
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकर
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकरांचा थेट कोर्टात खेचणार असा इशारा!
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! PM नरेंद्र मोदी यांनी सांगितले...
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले कर सुधारणांचे फायदे
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा थेट पुरावे दाखवत दावा