Until We Meet Again.. वैभवीच्या होणाऱ्या नवऱ्याची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट

अभिनेत्री वैभवी उपाध्यायच्या निधनानंतर तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तिचा होणारा पती जय गांधींनी नुकतीच एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे, जी पाहून तुमचेही डोळे पाणावतील.

Until We Meet Again.. वैभवीच्या होणाऱ्या नवऱ्याची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Image Credit source: instagram
| Updated on: May 31, 2023 | 9:28 AM

Jai Gandhi Emotional Post For Vaibhavi Upadhyaya : ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या लोकप्रिय मालिकेत जास्मिनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री वैभवी उपाध्यायने (Vaibhavi Upadhyaya) काही दिवसांपूर्वी जगाचा निरोप घेतला. गेल्या आठवड्यात हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या कार अपघातात 32 वर्षीय वैभवीचा मृत्यू झाला. तिच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबीय, टीव्ही इंडस्ट्रीतील सहकलाकार आणि विशेषत: तिचा होणारा पती जय गांधी (Jay Gandhi) हे तीव्र दु:खात बुडाले आहे. मित्रांशिवाय टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी वैभवी उपाध्याय यांना श्रद्धांजली वाहिली. निर्माते जेडी मजिठिया आणि ‘अनुपमा’च्या रुपाली गांगुली यांनीही सोशल मीडियावर त्यांचे दु:ख व्यक्त केले आणि त्यांनी वैभवीसोबत घालवलेला वेळ आठवला.

जय गांधी यांची इमोशनल पोस्ट

वैभवी उपाध्यायचे जय गांधीशी लग्न ठरले होते आणि दोघेही या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न करणार होते पण देवाच्या मनात काहीतरी वेगळेच होते. या अपघातामुळे वैभवी जय आणि त्याच्या कुटुंबापासून कायमची दुरावली आहे. वैभवीच्या निधनानंतर काही दिवसांनी तिचा होणारा पती जय गांधी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही इमोशनल पोस्ट वाचून तुमचेही डोळे पाणवतील.

 

Until we meet again… तुझ्यासोबतच्या त्या खास आठवणी नेहमीच माझ्या चेहऱ्यावर हास्य फुलवत राहतील. तू जर थोड्या वेळासाठीही परत येऊ शकलीस, तर आपण नेहमीप्रमाणे बसून बोलू शकतो. तू कायमच माझे सर्वस्व होतीस आणि नेहमीच राहशील. तू आता इथे (या जगात) नाहीस, ही वेदनादायक वस्तूस्थिती आहे आणि त्यामुळे मला नेहमीच वेदना होतील… पण आपण पुन्हा भेटेपर्यंत तू कायम माझ्या हृदयात राहशील… R I P my love” अशी पोस्ट लिहीत जयने दोघांचा एक फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

23 मे (मंगळवार) रोजी दुपारी हिमाचल प्रदेशमध्ये वैभवीच्या कारचा अपघात झाला. रस्त्याच्या एका तीव्र वळणावर गाडीचा ताबा सुटला आणि अपघात झाला. निर्माते जे. डी. मजेठिया यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट लिहित शोक व्यक्त केला होता. वैभवी ही गुजराती थिएटर सर्कलमध्ये प्रसिद्ध होती. साराभाई व्हर्सेस साराभाई या लोकप्रिय मालिकेतील तिची जास्मिनची भूमिका खूप गाजली होती. वैभवीला डोंगर, दऱ्यांमध्ये फिरायला खूप आवडायचं आणि तिचा शेवटचा इन्स्टाग्राम व्हिडीओही हिमाचल प्रदेश येथील होता.