AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर, ‘श्रीकांत’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान, पाहा संपूर्ण यादी

72nd National Film Awards announcement: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली आहे. जाणून घ्या कोणत्या विजेत्यांची लिस्ट.

72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर, 'श्रीकांत'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान, पाहा संपूर्ण यादी
Image Credit source: Social media
| Updated on: Jul 18, 2026 | 7:02 PM
Share

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली. 2024 या वर्षात सेन्सॉर प्रमाणपत्र (CBFC) मिळालेल्या चित्रपटांमधून विविध भाषांतील उत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि माहितीपटांचा गौरव करण्यात आला. यंदाच्या पुरस्कारांसाठी प्रसिद्ध दिग्दर्शक जयराज यांच्या अध्यक्षतेखालील 11 सदस्यीय परीक्षक मंडळाने देशभरातून आलेल्या चित्रपटांचे परीक्षण करून विजेत्यांची निवड केली. सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक (Best Film Critic) हा पुरस्कार संजीव श्रीवास्तव यांना प्रदान करण्यात आला.

फीचर फिल्म विभागातील प्रमुख पुरस्कार

यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘श्रीकांत’ या हिंदी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा मान मिळाला. तुषार हीरानंदानी दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म म्हणून ‘इम्बु’ या तुलू भाषेतील चित्रपटालाही गौरविण्यात आले. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवध्वज शेट्टी यांनी केले आहे. तमिळ चित्रपटसृष्टीत अभिनेता धनुष याने दिग्दर्शित केलेल्या ‘रायन’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट हा पुरस्कार जाहीर झाला.

तेलुगू भाषेतील ‘कमिटी कुरोलू’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट पुरस्कार पटकावला तर गढवाली भाषेतील ‘ढोली’ या चित्रपटाला त्या भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा सन्मान मिळाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश पी. भोसले यांनी केले आहे.

विशेष उल्लेख

यंदाच्या पुरस्कारांमध्ये अरविंद स्वामी आणि कार्ती यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘मेय्याझगन’ या चित्रपटाला विशेष उल्लेख पुरस्कार जाहीर झाला. तसेच धनुष अभिनित ‘कॅप्टन मिलर’ या चित्रपटालाही स्पेशल मेंशन पुरस्कार देण्यात आला आहे.

नॉन-फीचर फिल्म विभागातील विजेते

नॉन-फीचर फिल्म्स विभागात हिंदीतील ‘राम-नामी’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपट (Best Documentary) पुरस्कार मिळाला.

कला आणि संस्कृतीवरील सर्वोत्तम चित्रपट म्हणून हिंदीतील ‘मैं निदा’ या चित्रपटाची निवड करण्यात आली.

सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्तम नॉन-फीचर चित्रपट हा पुरस्कार हिंदी, राजस्थानी आणि इंग्रजी भाषांतील ‘पिपलांतरी – ए टेल ऑफ इको फेमिनिझम’ या चित्रपटाला जाहीर झाला.

सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन फिल्म म्हणून जेबी प्रॉडक्शन्स निर्मित आणि जोशी बेनेडिक्ट दिग्दर्शित ‘टच्ड अॅज वॉटर’ (सायलेंट) या चित्रपटाचा गौरव करण्यात आला.

दिग्दर्शन आणि तांत्रिक पुरस्कार

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी – एकता का प्रतीक’ या हिंदी चित्रपटासाठी दिग्दर्शक आनंद एल. राय यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार मिळाला.

मराठीतील ‘हमसफर’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघुपट (Best Short Film) पुरस्कार जाहीर झाला.

सर्वोत्कृष्ट संकलन (Editing) पुरस्कार हिंदीतील ‘एनडीए’ या चित्रपटासाठी मानवीर जसरोतिया यांना मिळाला.

तमिळ चित्रपट ‘ब्लू’साठी टी. एस. हरीहर सुधन यांना सर्वोत्कृष्ट ध्वनी रचना (Sound Design) पुरस्कार देण्यात आला.

‘लाइफ इन लूम’ (तमिळ, इंग्रजी, हिंदी, आसामी आणि बंगाली) या चित्रपटासाठी एडमंड रॅन्सम यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रण (Cinematography) पुरस्कार मिळाला.

संगीत, पटकथा आणि निवेदन

मराठी चित्रपट ‘ऑन द ट्रेल ४१ डिग्री’साठी शिवपाल सिंह कांग यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन पुरस्कार जाहीर झाला.

हिंदी-काश्मिरी लघुपट ‘ओबूर (Obur)’साठी फराज अली यांना सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार मिळाला.

‘लिटल प्लॅनेट – ए टेल ऑफ फ्रॉग्स’ या इंग्रजी चित्रपटासाठी सौंदर्य चयचंद्रन यांना सर्वोत्कृष्ट निवेदक (Narrator/Voice Over) पुरस्कार मिळाला.

विशेष उल्लेख आणि लेखन पुरस्कार

सर्वोत्कृष्ट सिनेलेखन (Best Writing on Cinema) अंतर्गत सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक म्हणून संजीव श्रीवास्तव यांचा गौरव करण्यात आला.

नॉन-फीचर विभागात ‘चोला डोरा और सुई’ (हिंदी) आणि ‘भद्र काली नाटकम’ (मल्याळम) या चित्रपटांना विशेष उल्लेख पुरस्कार जाहीर करण्यात आले.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ