AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉक्टरची बायको नाही तर, राजघराण्याची सून असती माधुरी दीक्षित, नातं का नाही पोहोचलं लग्नापर्यंत?

Madhuri Dixit Love Life: 'या' क्रिकेटपटूसोबत लग्न झालं असतं तर, आज माधुरीने राजघराण्याची सून म्हणून केलं असतं राज्य, एका कारणामुळे नातं नाही पोहोचलं लग्नापर्यंत

डॉक्टरची बायको नाही तर, राजघराण्याची सून असती माधुरी दीक्षित, नातं का नाही पोहोचलं लग्नापर्यंत?
फाईल फोटो
| Updated on: May 15, 2025 | 1:53 PM
Share

Madhuri Dixit Love Life: अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला आज कोणत्यात ओळखीची गरज नाही. अभिनेत्री आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. मोठ्या पडद्यावर दमदार भूमिका साकारणारी माधुरी फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत राहिली. आता अभिनेत्री पती डॉक्टर श्रीराम नेने आणि दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता माधुरी राजघराण्याचा मुलगा आणि क्रिकेटरच्या प्रेमात होती. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.

सांगायचं झालं तर, बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वाचं नातं फार जुनं आहे. अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींसोबत लग्न केलं. तर काहींचं मात्र ब्रेकअप झालं. ब्रेकअपच्या लिस्टमध्ये माधुरी – अजय यांचं देखील नाव आहे. 90 व्या दशकात माधुरी दीक्षित – अजय जडेजा यांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. दोघांना लग्न देखील करायचं होतं.

तेव्हा अजय जडेजा भारतीय क्रिकेट संघाचे उपकर्णधार होते. बॉलिवूडमध्ये करीयर करत असताना माधुरी – अजय यांची पहिली ओळख एका मॅगझीन शूट दरम्यान झाली. कालांतराने दोघांच्या पहिल्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांच्या खासगी आयुष्याची चर्चा देखील तुफान रंगली.

सांगायचं झालं तर, अजय जडेजा शाही कुटुंबातील होते. अशा परिस्थितीत जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा जडेजाच्या कुटुंबीयांनी त्याचं ऐकलं नाही आणि लग्नासाठी स्पष्ट नकार दिला. कुटुंबियांनी नकार दिल्यानंतर माधुरी आणि अजय यांच्या नात्याला ब्रेक लागला. दरम्यान, जडेजा मॅच फिक्सिंगमध्ये अडकले आणि त्यांची प्रेमकहाणी अपूर्ण राहिली.

अजय, मोहम्मद अझरुद्दीनसोबत फिक्सिंगमध्ये अडकले, ज्यामुळे वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर माधुरीच्या कुटुंबीयांनी देखील जडेजाकडे पाठ फिरवली आणि अमेरिकेत माधुरी हिचं लग्न डॉ.श्रीराम नेने यांच्यासोबत झालं. तर अजय जडेजा यांचं देखील लग्न झालं.

एका रात्रीत श्रीमंत झाले जडेजा

अजय जडेजा यांना जामनगर येथील राजा घोषित करण्यात आलं. ज्यामुळे जडेजा यांच्या संपत्तीमध्ये देखील मोठी वाढ झाली. त्यांची नेटवर्थ 250 कोटी रुपये होती. पण आता अजय जडेजा यांची संपत्ती 1455 कोटी झाली आहे. पण आता ते भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये अव्वल स्थानी आहेत.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान