AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lucky Ali On Javed Akhtar : जावेद अख्तर यांची लकी अली यांनी माफी तर मागितली, पण माफी मागतानाही केला वार…

गीतकार जावेद अख्तर यांनी हिंदू-मुस्लीमांवर केलेल्या वक्तव्यांवर गायक लकी अली यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यांनी जावेद यांना दृष्ट माणूस म्हटले होते.परंतू आता लकी यांनी जावेद यांची माफी तर मागितली मात्र....

Lucky Ali On Javed Akhtar : जावेद अख्तर यांची लकी अली यांनी माफी तर मागितली, पण माफी मागतानाही केला वार...
Lucky Ali Apologizes To Javed Akhtar
| Updated on: Oct 23, 2025 | 8:30 PM
Share

बॉलीवूडचे दिग्गज गीतकार जावेद अख्तर यांच्या एका व्हिडीओतील वक्तव्यावर बॉलीवूड गायक लकी अली संतापले होते. ज्यात जावेद यांनी हिंदूंना मुसलमानांसारखे बनू नका असा सल्ला दिला होता. जावेद यांच्या हिंदू-मुस्लीमांसंदर्भातील वक्तव्यावर लकी अली यांनी जावेद अख्तर यांच्यावर टीका केली होती. त्यांनी जावेद अख्तर सारखे बनू नका असा सल्लाही दिला होता. त्यानंतर आता लकी अली यांनी जावेद अख्तर यांची माफी तर मागितली आहे.परंतू माफी मागतानाही लकी अली यांनी अख्तर यांना टोमणा मारला आहे.

लकी अली यांच्या पोस्टवर वाद वाढल्यानंतर गायक लकी अली यांनी जावेद यांची माफी मागितली आहे. त्यांनी आधी जावेद यांच्यावर संतापून लिहिली होते की जावेद अख्तर सारखे बनू नका. कधी ओरिजनल राहिले नाहीत, खूपच वाईट दृष्ट ( ugly) आहेत. त्यानंतर त्यांनी लेटेस्ट पोस्टमध्ये लिहीलेय की हे माझ्यातर्फे चुकीचे वक्तव्य होते. परंतू त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुन्हा मॉन्स्टर ( राक्षस ) शब्दांचा वापर केला आहे.

‘मी कोणाच्या दृष्टतेला ठेच पोहचवली असेल तर…’

जावेद अख्तर यांच्यावर टीका केल्यानंतर लकी अली यांनी पुन्हा जावेद यांच्या तिखट शब्दात टोमणा मारला आहे. त्यांनी जरी माफी मागितली असली तर त्यातही लकी यांनी जावेद यांना दृष्ट म्हटले आहे. लकी अली यांनी आपल्या एक्स पोस्ट मध्ये लिहीलेय की माझ्या मत हे होते की ‘अहंकार वाईट असतो. हे माझ्यावतीने चुकीचे वक्तव्य होते. राक्षसांच्या देखील भावना असू शकतातत आणि मी कोणाच्या दृष्टतेला ठेच पोहचवली असेल तर मी माफी मागतो’

येथे पोस्ट पाहा –

जावेद अख्तर यांनी काय म्हटले होते ?

जावेद यांचा एक व्हिडीओ खूप चर्चेत आहे. त्यात ते म्हणतात की, शोलेत एक सीन होता. त्यात धर्मेंद्र शंकराच्या मूर्तीच्या मागे लपून बोलतात. आणि हेमा मालिनी यांना वाटते की भोले शंकर तिच्याशी बोलत आहेत. आज असा सीन शक्य आहे का ? मी आज असा सीन लिहणार नाही. १९७५ मध्ये हिंदू नव्हते का? कोणी धार्मिक लोक नव्हते का ? वास्तविक मे रेकॉर्डवर आहे. मी ही बाब येथे सांगत नाहीए. राजू हिराणी आणि मी पुण्यात एका मोठ्या ऑडियन्स समोर होतो. आणि मी म्हणालो, ‘मुसमानांसारखे बनू नका. त्यांना आपल्या सारखे बनवा, तुम्ही मुसलमानांसारखे बनत आहात, हे एक संकट आहे’

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...