AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माधुरी दीक्षित, डॉ. श्रीराम नेने यांच्या ‘पंचक’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर पाहिलात का?

"ही एक विचित्र स्थिती आहे, परंतु अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने ती प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली आहे. हा एक कौटुंबिक आणि विनोदी चित्रपट आहे, जो प्रत्येकाने एकत्र पाहावा असा आहे," अशी प्रतिक्रिया माधुरी दीक्षितने दिली आहे. हा चित्रपट नवीन वर्षात 5 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

माधुरी दीक्षित, डॉ. श्रीराम नेने यांच्या 'पंचक' चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर पाहिलात का?
Panchak movieImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 14, 2023 | 8:31 PM
Share

मुंबई : 14 डिसेंबर 2023 | बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने प्रस्तुत ‘पंचक’ या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘पंचक’चा शानदार ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने या मराठमोळ्या जोडीने हा खास मराठी चित्रपट आपल्या मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. जयंत जठार, राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. राहुल आवटे यांचं लेखन असलेल्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत.

घरात पंचक लागल्याने आता कोणाचा नंबर लागणार, याची भीती घरातील सर्वांनाच भेडसावत असतानाच प्रत्येक जण आपापल्या परीने यावर उपायही शोधत आहे. या सगळ्यात कोणाची सर्कस सुरू आहे तर कोणाचा ऑपेरा सुरु आहे. आता खोतांच्या घराला लागलेले ‘पंचक’ कसे सुटणार, हे बघताना प्रेक्षकांना मजा येणार आहे. हा चित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 5 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाबद्दल डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने म्हणाले, ”यापूर्वीही आम्ही एका चित्रपटाची निर्मिती केली होती, जो ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. ‘पंचक’ हा आमचा पहिला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार चित्रपट आहे. ‘पंचक’ खरंतर सर्वार्थानेच खास आहे. या चित्रपटात अनेक मात्तबर कलाकार आहेत. कथा उत्तम आहे. प्रेक्षकांना आपल्या आसपास घडणाऱ्या घटना चित्रपटरूपात पाहायला अधिक आवडतात. ‘पंचक’ हा त्यापैकीच एक आहे.”

चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल आवटे याविषयी म्हणाले, “श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयावर या चित्रपटातून ज्ञान देण्याचा आमचा अजिबात हेतू नाही. आम्ही फक्त एक निखळ मनोरंजन करणारी कथा प्रेक्षकांसमोर मांडत आहोत. एका घरात एखादी घटना घडते आणि त्यातून निर्माण झालेल्या भीतीमुळे आपोआपच होणारे विनोद, अशी ‘पंचक’ची संकल्पना आहे. चार्ली चॅप्लिनच्या म्हणण्यानुसार ‘लाईफ इज अ ट्रजिडी इन क्लोज अप, बट अ कॅामेडी इन लाँग शॅाट, हा चित्रपट अगदी तसाच आहे. जेव्हा आम्ही तो लिहिला तेव्हा त्या पात्रांसाठी ती भीती होती परंतु प्रेक्षकांसाठी ही धमाल आहे.

“खरं सांगायचं तर ही कथा माझ्या आयुष्यात घडली होती. सुरूवातीला खूप भीती वाटायची. परंतु कालांतराने त्याची मी मजा घ्यायला लागलो आणि त्यातूनच मला हा विषय सुचला. आता हा कल्लोळ पाहाताना प्रेक्षकांनाही मजा येणार आहे. माझ्या दिग्दर्शनाच्या पदार्पणातच मला माधुरी दिक्षित नेने आणि डॅा, श्रीराम नेने यांच्यासारखे निर्माते लाभले, यातच सगळं आलं आहे. या चित्रपटात अतिशय नामवंत कलाकार आहेत. त्यामुळे कागदावरील हा ‘पंचक’ आता लवकरच पडद्यावर झळकणार आहे,” असं दिग्दर्शक जयंत जठार यांनी सांगितलं.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.