Madhuri Dixit: माधुरी दीक्षितने लोअर परळमध्ये खरेदी केला आलिशान फ्लॅट; पहा फोटो

53 व्या मजल्यावर असलेल्या माधुरीच्या या घराची किंमत वाचून डोळे विस्फारतील!

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितने लोअर परळमध्ये खरेदी केला आलिशान फ्लॅट; पहा फोटो
Madhuri Dixit
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 05, 2022 | 1:25 PM

मुंबई- बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिने मुंबईत (Mumbai) नवीन घर खरेदी केलं आहे. मुंबईतील लोअर परळ (Lower Parel) भागात माधुरीने 53 व्या मजल्यावर हा आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. 28 सप्टेंबर 2022 रोजी या प्रॉपर्टीची नोंदणी झाली. या घराची किंमत वाचून तुमचेही डोळे विस्फारतील. लोअर परळमधील इंडियाबुल्स ब्लूमध्ये माधुरीने हे नवीन घर खरेदी केलं आहे.

इंडियाबुल्सच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार दक्षिण मुंबईतील वरळी इथं ही प्रॉपर्टी 10 एकर परिसरात पसरलेली आहे. इथून अरबी समुद्राचं विहंगम दृश्य पहायला मिळतं. या टॉवरमध्ये मोठे स्विमिंग पूल्स, फुटबॉल पिच, जिम, स्पा, क्लब आणि इतर अनेक सुविधा आहेत.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, माधुरीने सप्टेंबरमध्ये कॅलिस लँड डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड या विक्रेत्यांशी कन्व्हेयन्स डीडवर स्वाक्षरी केली. यावेळी स्टँप ड्युटीसाठी तिने 2.4 कोटी रुपये भरले. माधुरीचा हा फ्लॅट 5 हजार 384 चौरस फूटांवर पसरलेला आहे. यासोबतच तिने सात कार पार्किंगची जागा घेतली आहे. या फ्लॅटची किंमत तब्बल 48 कोटी रुपये इतकी आहे.

महाराष्ट्रात जर एखादी महिला घर खरेदी करत असेल तर स्टँप ड्युटीवर एक टक्का सवलत दिली जाते. त्यामुळे या फ्लॅट खरेदीवर राज्याच्या महसूल विभागाकडून माधुरीला एक टक्का सवलत देण्यात आली होती.

माधुरीने 1999 मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं आणि ती अमेरिकेत स्थायिक झाली. काही वर्षांपूर्वीच ती कुटुंबीयांसह भारतात परतली. भारतात परत आल्यावर माधुरी पुन्हा एकदा कलाविश्वात सक्रीय झाली. ती सध्या झलक दिखला जा 10 या डान्सिंग शोमध्ये परीक्षक म्हणून काम करतेय.