AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फेस रीडरने 21 वर्षांपूर्वी माधुरी दीक्षितचा चेहरा पाहून केली होती भविष्यवाणी; चाहते म्हणाले ‘सर्वच खरं ठरलं’

माधुरीचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत एक फेस-रीडर अभिनेत्रीचा चेहरा पाहून भविष्यवाणी करताना दिसतेय. विशेष म्हणजे फेस रीडरने जे काही म्हटलंय, ते सर्व आज खरं ठरलंय.

फेस रीडरने 21 वर्षांपूर्वी माधुरी दीक्षितचा चेहरा पाहून केली होती भविष्यवाणी; चाहते म्हणाले 'सर्वच खरं ठरलं'
माधुरी दीक्षितचा 21 वर्षांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरलImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 15, 2023 | 2:10 PM
Share

मुंबई: माधुरी दीक्षित हे भारतीय सिनेसृष्टीतील एक असं नाव आहे, जिच्या सौंदर्याचे, अदाकारीचे, अभिनय आणि नृत्यकौशल्याचे असंख्य चाहते आहेत. जवळपास 40 वर्षांच्या करिअरमध्ये माधुरीने 70 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हेमा मालिनी आणि श्रीदेवी यांच्यानंतर माधुरीने स्वत:ची वेगळी ओळख केवळ देशभरातच नाही तर परदेशातही बनवली. नव्वदच्या दशकात ती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. आजसुद्धा माधुरी चित्रपट किंवा रिॲलिटी शोच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करतेय. यादरम्यान माधुरीचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत एक फेस-रीडर अभिनेत्रीचा चेहरा पाहून भविष्यवाणी करताना दिसतेय. विशेष म्हणजे फेस रीडरने जे काही म्हटलंय, ते सर्व आज खरं ठरलंय.

हा व्हिडीओ सोनी टीव्हीच्या ‘कहीं ना कहीं कोई है’ या मॅट्रिमोनियल शोमधील आहे. जवळपास 21 वर्षांपूर्वीच्या या व्हिडीओ क्लिपमध्ये माधुरीने निळ्या रंगाचा सलवार सूट परिधान केला आहे. तिच्यासमोर एक महिला बसली आहे. माधुरी त्यांना विचारते की तुम्ही फेस रीडिंग करता का? त्यावर ती महिला म्हणते की तिला थोडंथोडं त्याविषयी माहिती आहे. त्यानंतर माधुरी तिच्या चेहऱ्याविषयी विचारते. “अच्छा तर हा चेहरा पाहून सांगा की त्याचं नशीब काय आहे”, असा सवाल ती करते.

महिलेनं केली माधुरीची भविष्यवाणी

माधुरीच्या प्रश्नावर ती महिला भविष्यवाणी करत म्हणते, “तू इतकी भाग्यशाली आहेस की भाग्य तुझ्यासमोर हात जोडून उभं आहे. प्रेमाची मूर्ती आहेस.” हे ऐकून माधुरीच्या चेहऱ्यावर हास्य उमटतं. ती महिला पुढे म्हणते, “तू नेहमी सुखी राहशील.” ही भविष्यवाणी ऐकून माधुरी खुश होते. “तुम्ही इतकी चांगली गोष्ट म्हणालात”, असं ती त्यांना म्हणते आणि नि:शब्द होते.

चाहत्यांची प्रतिक्रिया

माधुरीच्या या व्हिडीओवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिलं, ‘त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी खऱ्या ठरल्या आहेत. ती वैवाहिक आयुष्यातही भाग्यवान आहे.’ तर खरंच माधुरीसमोर भाग्य हात जोडून उभा आहे, असं दुसऱ्याने म्हटलंय.

माधुरी दीक्षितने 1984 मध्ये ‘अबोध’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब’ या चित्रपटामुळे माधुरीला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने ‘राम लखन’, ‘त्रिदेव’, ‘साजन’, ‘खलनायक’, ‘दिल’, ‘बेटा’, ‘हम आपके है कौन’, ‘दिल तो पागल है’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं. गेल्या वर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘द फेम गेम’ ही तिची वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सीरिजलाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.