27 वर्षांपूर्वी माधुरीनं ज्या गाण्यावर घायाळ केलं, त्यावरच आता बॅटमॅनची हवा; ट्रेंडनंतर वाढल्या तब्बल इतक्या Views

माधुरी दीक्षितच्या अदांनी 27 वर्षांपूर्वी लोकप्रिय झालेलं एक गाणं आता पुन्हा चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे, यावेळी माधुरी नाही तर चक्क Batman या गाण्यावर ठुमके लगावताना दिसतोय. सोशल मीडियावरील Desi Batman ट्रेंडमुळे या गाण्याची पुन्हा चर्चा सुरू झाली असून YouTubeवर त्याने 126 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळवले आहेत.

27 वर्षांपूर्वी माधुरीनं ज्या गाण्यावर घायाळ केलं, त्यावरच आता बॅटमॅनची हवा; ट्रेंडनंतर वाढल्या तब्बल इतक्या Views
madhuri dixit 1999 arzoo sajan sajan teri dulhan song
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 25, 2026 | 12:41 AM

काही गाणी अशी असतात, जी ऐकताच जुन्या आठवणी ताज्या होतात. त्यातही माधुरी दीक्षितचा डान्स असेल तर मग काय बोलायलाच नको. तिच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन्स, नृत्याची खास स्टाइल आणि मनमोहक अदांनी अनेक गाणी अजरामर केली आहेत. असंच एक गाणं तब्बल 27 वर्षांनंतर पुन्हा चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे, या गाण्यावर आता माधुरी नाही तर चक्क Batman करामती करताना दिसतोय. सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ व्हायरल होत असून, या गाण्याला YouTubeवर तब्बल 124 मिलियनपेक्षा जास्त Views मिळालेले आहेत. पण माधुरीचं हे नेमकं गाणं आता आणखी Views मिळवत आहे. गेल्या काही दिवसांत या गाण्याने आता पुन्हा एकदा 2 मिलियन Views मिळवल्या असल्याचा दावा केला जात आहे. या गाण्याला सध्या युट्यूबवर आता 126 मिलियन Views दिसत आहेत.

माधुरीच्या अदांची आजही जादू

1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आरजू’ चित्रपटातील ‘साजन साजन तेरी दुल्हन’ हेच ते गाणं असून आजही ते प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या गाण्यात माधुरी दीक्षितचा सुंदर पारंपरिक लूक आणि तिचा डान्स पाहायला मिळाला होता. अलका याग्निक यांच्या आवाजातील या गाण्याला अनु मलिक यांनी संगीत दिलं होतं. आनंद बक्षी यांनी गाण्याचे बोल लिहिले होते. माधुरीच्या अदांमुळे हे गाणं त्यावेळीही लोकप्रिय झालं आणि आजही त्याची क्रेझ कायम आहे.

Loading...

आता Batmanमुळे गाणं चर्चेत

सध्या सोशल मीडियावर ‘Desi Batman’ ट्रेंड व्हायरल होत आहे. यात Batman भारतीय बाजारपेठ, चहाच्या टपऱ्या आणि गावखेड्याच्या परिसरात दिसतो. विशेष म्हणजे, या व्हिडिओंमध्ये ‘साजन साजन तेरी दुल्हन’ हे गाणं वापरलं जात आहे. Batmanचा काळा पोशाख आणि या रोमँटिक गाण्याचं भन्नाट कॉम्बिनेशन नेटकऱ्यांना आवडत आहे.

126 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज

या गाण्याला YouTubeवर 126 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. करवा चौथसारख्या सणांच्या काळातही या गाण्याची चर्चा वाढते. एकीकडे माधुरीच्या डान्सची जादू आणि दुसरीकडे सोशल मीडियावरील नवे ट्रेंड, यामुळे 27 वर्षांपूर्वीचं हे गाणं पुन्हा एकदा नव्या पिढीच्या प्लेलिस्टमध्ये पोहोचलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us