AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana: ‘ऑस्कर मिळेल’ म्हणणारे नितीश भारद्वाज ‘रामायण’वर भडकले; म्हणाले, एकही चांगली गोष्ट..

रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 5 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. आता नितीश भारद्वाज यांच्या या टीकेमुळे ‘रामायण’च्या कथानकातील बदल आणि सर्जनशील स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Ramayana: ‘ऑस्कर मिळेल’ म्हणणारे नितीश भारद्वाज 'रामायण'वर भडकले; म्हणाले, एकही चांगली गोष्ट..
रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटावर नितीश भारद्वाज यांची टीकाImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 10, 2026 | 3:57 PM
Share

Ramayana: अभिनेता रणबीर कपूरच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाची सध्या मनोरंजनविश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. भव्य सेट, दमदार व्हीएफएक्स आणि कलाकारांची मोठी फौज यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, आता या चित्रपटावरून एक नवा वाद निर्माण झाला आहे. बी. आर. चोप्रा यांच्या लोकप्रिय ‘महाभारत’ मालिकेत भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज यांनी ‘रामायण’वर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी याच चित्रपटाला ऑस्कर मिळेल, अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती. मात्र, चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी आपलं आधीचं कौतुक मागे घेतलं आहे.

नेमकं काय म्हणाले नितीश भारद्वाज?

नितीश भारद्वाज यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी ‘रामायण’ चित्रपटातील रावणाच्या व्यक्तिरेखेवर आक्षेप घेतला आहे. रामायण ही केवळ मनोरंजनासाठी सांगितली जाणारी कथा नसून भारताच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सभ्यताविषयक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे या महाकाव्यातील प्रमुख पात्रांचे मूळ स्वरूप आणि त्यांचे महत्त्व बदलताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले. चित्रपटात यशने साकारलेल्या रावणाला अत्यंत उदारमतवादी, सामाजिक न्याय मानणारा आणि न्यायप्रिय राजा म्हणून दाखवण्यात आल्याचं भारद्वाज यांनी म्हटलं आहे. अशा प्रकारच्या मांडणीमुळे रामायणातील मूळ नैतिक चौकट बदलते आणि श्रीरामांच्या अवतारामागील उद्देशालाच धक्का बसतो, असं त्यांचं म्हणणं आहे.

नितीश भारद्वाज यांची पोस्ट

चित्रपटातील भव्य दृश्ये आणि अत्याधुनिक व्हीएफएक्स यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. केवळ तांत्रिक भव्यता म्हणजे एखाद्या महाकाव्याचं यश नाही. त्यातील तत्त्वज्ञान, आध्यात्मिक गाभा आणि मूळ मूल्ये जपणं अधिक महत्त्वाचं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. ‘मी या चित्रपटामुळे अत्यंत नाराज आणि निराश आहे. माझं याआधीचं कौतुक मी मागे घेत आहे. या चित्रपटाबद्दल सांगण्यासारखी एकही चांगली गोष्ट मला आढळत नाही. व्हीएफएक्सचा भव्य देखावा या महाकाव्याची तात्त्विक खोली आणि आध्यात्मिक सार यांची जागा घेऊ शकत नाही,’ अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली.

तसंच भारतीय इतिहास, वारसा आणि आध्यात्मिक मूल्यांचं चुकीचं चित्रण करणाऱ्या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय सिनेमाचं प्रतिनिधित्व करू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे, ‘रामायण’चा ट्रेलर पाहिल्यानंतर नितीश भारद्वाज यांनी चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं होतं. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाचं, भव्य निर्मितीचं आणि व्हीएफएक्सचं त्यांनी विशेष कौतुक केलं होतं. संगीतकार हान्स झिमर आणि ए. आर. रहमान यांच्या सहकार्याचंही त्यांनी स्वागत केलं होतं. एवढंच नव्हे तर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाच्या श्रेणीत 100 टक्के ऑस्कर मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. मात्र, चित्रपट पाहिल्यानंतर त्यांची भूमिका पूर्णपणे बदलली आहे.

Follow Us
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची...
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची महत्त्वपूर्ण बैठक
प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
दिवाळीच्या फराळातून जपले मैत्रीचे नाते! प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, सतेज पाटील 24 तारखेला....
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, मुश्रीफांचा महायुतीच्या विजयाचा दावा; सतेज पाटील 24 तारखेला पुढची भूमिका ठरवणार
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; राजेश पाटील..
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; बड्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब!
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने...
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने सरकारला घेरलं!
गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे..
Gokul : गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे 16 सदस्यांचं संख्याबळ, अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा?