AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृत्युपेक्षा भयानक…, ‘महाभारत’मधील कृष्णाचं दुसऱ्या पत्नीबद्दल मोठं विधान

nitish bharadwaj smita gate | 'मुलींचं अपहरन केलं....' IAS पत्नीविरोधात तक्रार करणारे ‘महाभारत’मधील कृष्ण म्हणतात, 'निधनापेक्षा अधिक भयानक...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नितीश भारद्वाज यांची चर्चा...

मृत्युपेक्षा भयानक...,  ‘महाभारत’मधील कृष्णाचं दुसऱ्या पत्नीबद्दल मोठं विधान
| Updated on: Feb 16, 2024 | 10:03 AM
Share

nitish bharadwaj smita gate | 1988 साली प्रसारित झालेल्या ‘महाभारत’ मालिका सर्वांना माहिती आहे. मालिकेची चर्चा आजही चाहत्यांमध्ये कायम रंगलेली असते. मालिकेत अभिनेते नितीश भारद्वाज यांनी श्री कृष्ण यांची भूमिका साकराली होती. पण आता नितीश भारद्वाज त्यांच्या मालिकेमुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहे. नितीश भारद्वाज यांनी दुसऱ्या पत्नी आयएसएस अधिकारी असलेल्या स्मिता गटे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. एवढंच नाही तर, घटस्फोटाबद्दल देखील नितीश भारद्वाज यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

दुसऱ्या पत्नीवर गंभीर आरोप करत, स्मिता गटे यांनी माझ्या दोन्ही मुलींचं अपहरण केलं आहे. गेल्या 4 वर्षांपासून मी माझ्या मुलींना भेटलो नाही… असं देखील नितीश भारद्वाज म्हणाले आहे. नितीश भारद्वाज आणि स्मिता गटे यांचा घटस्फोट 2019 मध्ये झाला.

घटस्फोटानंतर नितीश भारद्वाज यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहणं बंद केलं होतं. ‘घटस्फोटाची प्रक्रिया सुरु होती. त्रस्त होतो… 2019 मध्ये मी मुंबईतील फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दिला होता. आम्ही विभक्त होतोय हे मला कोणाला सांगायचं नव्हतं…’

पुढे नितीश भारद्वाज म्हणाले, ‘प्रकरण अद्याप कोर्टात सुरु आहे. मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे. निधनापेक्षा अधिक भयानक घटस्फोट आहे. कारण तुमच्या वाट्याला फक्त ऐकटेपणा येतो…’ एवढंच नाही, पत्नीबद्दल काहीही वाईट लिहू नका… अशी विनंती देखील नितीश भारद्वाज यांनी सोशल मीडियावर युजर्सना केली आहे.

नितीश भारद्वाज सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे नितीश भारद्वाज यातून बाहेर येण्यासाठी मित्र, कुटुंबिय, अध्यात्म आणि मेडिटेशनच्या माध्यमातून स्वतःला सावरण्यचा प्रयत्न करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि नितीश भारद्वाज यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

नितीश भारद्वाज आणि स्मिता गटे यांनी 2009 मध्ये लग्न केलं. नितीश भारद्वाज आणि स्मिता गटे यांनी जुळ्या मुली आहेत. स्मिता गटे यांच्यासोबत नितीश भारद्वाज यांचं दुसरं लग्न आहे नितीश भारद्वाज यांचे पहिलं लग्न मोनिका पाटील यांच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. नितीश भारद्वाज आणि मोनिका यांचा घटस्फोट 2005 मध्ये झाला. नितीश भारद्वाज सध्या दुसऱ्या घटस्फोटामुळे चर्चेत आले आहेत.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.