Mahabharat: आता डिस्ने प्लस हॉटस्टार दिसणार ‘महाभारत’ ; फर्स्ट लुक सोशल मीडियावर व्हायरल

महाभारताची कथा तुम्ही टीव्हीवर अनेकदा पाहिली असेल. बीआर चोप्राचा ‘महाभारत’ (Mahabharat)हा टेलिव्हिजन इतिहासातील सर्वात लोकप्रिय टीव्ही शो आहे. याशिवाय 2013 मध्ये स्टार प्लसवर महाभारत टेलिकास्ट झाला होता. त्यालाही चांगलीच पसंती मिळाली होती. आता त्याची कथा ओटीटीवर दाखवण्यासाठी सज्ज होत आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारने(Disney Plus Hotstar) शुक्रवारी अमेरिकेत सुरू असलेल्या D23 एक्स्पोमध्ये एका मोठ्या भारतीय प्रकल्पाची […]

Mahabharat: आता डिस्ने प्लस हॉटस्टार दिसणार महाभारत ; फर्स्ट लुक  सोशल मीडियावर व्हायरल
| Updated on: Sep 10, 2022 | 7:31 PM

महाभारताची कथा तुम्ही टीव्हीवर अनेकदा पाहिली असेल. बीआर चोप्राचा ‘महाभारत’ (Mahabharat)हा टेलिव्हिजन इतिहासातील सर्वात लोकप्रिय टीव्ही शो आहे. याशिवाय 2013 मध्ये स्टार प्लसवर महाभारत टेलिकास्ट झाला होता. त्यालाही चांगलीच पसंती मिळाली होती. आता त्याची कथा ओटीटीवर दाखवण्यासाठी सज्ज होत आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारने(Disney Plus Hotstar) शुक्रवारी अमेरिकेत सुरू असलेल्या D23 एक्स्पोमध्ये एका मोठ्या भारतीय प्रकल्पाची घोषणा केली. यात महाभारतावरील वेब सिरीजचाही (Web series)समावेश आहे. याशिवाय ‘कॉफ़ी विथ करण सीझन 8 ‘ आणि ‘शो टाइम’ नावाची एक नवीन मालिका आहे. ‘महाभारत’ ची निर्मिती मधु मंटेना, मायथोवर्स स्टुडिओ आणि अल्लू एंटरटेनमेंट करणार आहेत.

निवेदन जारी करत दिली माहिती

वेब सीरिजची निर्मिती करणाऱ्या मधु मंतेना यांनी एक निवेदन जारी केले की, ‘असे म्हटले जाते की, मानवजातीला जे काही अनुभव येत असतील, एक ना एक भावनिक संघर्ष महाभारताच्या कथा आणि पात्रांमध्ये दिसून येतो. डिस्ने प्लस हॉटस्टारने ऑफर केलेली संधी मिळाल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे.

पुढील वर्षी अपेक्षित

डिस्ने प्लस हॉट स्टारचे कंटेंट द्वेषी गौरव बॅनर्जी म्हणाले, “कोट्यवधी लोक आहेत ज्यांना ही कथा कोणत्या ना कोणत्या प्रकारे माहीत आहे. माझ्या देशातील बहुतेक लोकांनी त्यांच्या लहानपणी त्यांच्या आजी-आजोबांकडून या कथा ऐकल्या आहेत, आणखी करोडो लोक आहेत या पासून अज्ञानी आहेत . पुढील वर्षी ही अविश्वसनीय कथा जागतिक प्रेक्षकांपर्यंत नेणे हा एक नशीबवान गोष्ट असेल.”