डोळे कान उघडे ठेवा पण तोंड बंद करा…, आजच्या राजकारणावर मोहन आगाशे यांचं सूचक भाष्य
Maharashtra Politics : आकाश फाटलं तरी कुणाकडे हात मारायचा अशी परिस्थिती.... आजच्या राजकीय परिस्थितीवर ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांचं खोचक वक्तव्य...म्हणाले, 'डोळे कान उघडे ठेवा पण तोंड बंद करा...'

महाराष्ट्रात 29 महापालिकांसाठी आज मतदान होत आहे. या 29 महापालिकांमध्ये 15,931 उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. मुंबईसह 29 महानगरपालिकांमध्ये एकूण 2869 जागा आहेत. तर एकूण 3 कोटी 48 हजार मतदार आहेत. म्हणून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांसह सेलिब्रिटी देखील मतदानाचा हक्क बजावत आहेत आणि सर्वांना मतदान अधिकार बजावण्यासाठी सांगत आहेत. जेष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राज्याच्याा राजकारणावर सूचक भाष्य केलं आहे.
पुण्यातील प्रभात रोडवरच्या विमलाबाई गरवारे शाळेतील मतदान केंद्रावर त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. डोळे कान उघडे ठेवा पण तोंड बंद करा… यावेळी मतदान केल्यानंतर भावना शून्य झालेलो आहे अशी खोचक प्रतिक्रिया मोहन आगाशे यांनी दिलेली आहे..
काय म्हणाले मोहन आगाशे?
मतदान केल्यानंतर मोहन आगाशे यांनी पूर्वीचं राजकारण आणि आताच्या राजकारणावर मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मतदान केल्यानंतर भावना शून्य झालेलो आहे… सुरुवातीची परिस्थिती आणि सध्याची परिस्थिती यात मोठा फरक पडलेला आहे. कोण कुठे आहे काहीच कळत नाही…
‘एकदिलाने काम करायचं म्हणतात पण कृतीत होणार आहे की नाही? हे माहिती नाही.. एकूणच फार अवघड होत चाललेल आहे. असलेले रिसोर्सेस आणि असलेली लोकसंख्या यावर कोणी काही बोलत नाही…. लोकांना आपण जोपर्यंत सजक करत नाही.. तोपर्यंत कमीच पडणार. आकाश फाटलं तरी कुणाकडे हात मारायचा अशी परिस्थिती होईल आपली..’
पुढे मोहन आगाशे म्हणाले, ‘ प्रोफेशनली आपलं काम करणं महत्त्वाचं आहे. पूर्वी याकडे वेगळ्या प्रकारे बघितले जायचं.. देशाप्रती असलेली निष्ठा.. लोकांसाठी काहीही न घेता काम करणं… पहिली आणि सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे हे मी सांगण्यापेक्षा.. तुम्ही पत्रकार आहात तुम्ही बघतच आहात.. भांडण असली तरी शांत डोक्याने आर्ग्युमेंट करणं वेगळं.
डोळे कान उघडे ठेवा.. तोंड बंद करा – मोहन आगाशे
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मोहन आगाशे म्हणाले, ‘हे आले की ह्यांना उलथवून कसं टाकायचं.. आणि ते आले की त्यांना उलथवून कसं टाकायचं हेच सध्या दिसत आहे.. वरवर असं दिसतंय एकमेकांना कोणी चांगलं म्हणत नाही..असं पूर्वी नव्हतं. डोळे कान उघडे ठेवा.. तोंड बंद करा.. जे दिसतं, जे ऐकू येत, जे पाहतोय.. ते खरोखर पहा.. आणि तुम्हाला आतून जे वाटतंय ते करा.. असं आवाहन मोहन आगाशे यांनी मतदारांना केलं आहे.