AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमचा ऑस्ट्रेलियात धमाल डान्स; कल्ला पाहून नेटकरीही झाले खुश!

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाची टीम सध्या परदेश दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियातील विविध शहरात हे विनोदवीर लाइव्ह परफॉर्म करणार आहेत. मात्र त्यापूर्वी त्यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी या टीमने जबरदस्त डान्स केला आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीमचा ऑस्ट्रेलियात धमाल डान्स; कल्ला पाहून नेटकरीही झाले खुश!
Prajakta MaliImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 05, 2024 | 12:45 PM
Share

मुंबई : 5 मार्च 2024 | ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाची प्रचंड लोकप्रियता आहे. यातील विनोदवीरांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. केवळ भारतातच नाही तर परदेशातही हास्यजत्रेच्या विनोदवीरांची प्रचंड लोकप्रियता आहे. याआधीही हास्यजत्रेची टीम अनेकदा परदेश दौऱ्यावर गेली होती. आता पुन्हा एकदा ही टीम ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी, मेलबर्न या शहरांमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’ची टीम लाइव्ह परफॉर्म करणार आहे. विनोदवीरांसोबत सूत्रसंचालिका प्राजक्ता माळीसुद्धा ऑस्ट्रेलियाला गेली आहे. तिथून तिने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे.

ऑस्ट्रेलियातील फिलिप आयलँड याठिकाणी हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमने मिळून एका गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. याच डान्सचा व्हिडीओ प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ‘जेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलियात असता आणि वेड्यांचा एक ग्रुप एकत्र येतो तेव्हा..’ असं कॅप्शन देत प्राजक्ताने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘सचिन मोटे सरसुद्धा सहभागी झाले, याचा विशेष आनंद झालाय’, असंही तिने म्हटलंय. प्राजक्तासह सचिन मोटे, समीर चौघुले, नम्रता संभेराव, वनिता खरा, प्रसाद खांडेकर, चेतना भट, पृथ्वीक प्रताप, ओंकार राऊत यांनी मिळून ‘कुडिये नी’ या इन्स्टाग्रामवर ट्रेंडिंगमध्ये असलेल्या गाण्यावर डान्स केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

पहा व्हिडीओ-

हास्यजत्रेची टीम आमचं मनोरंजन करण्यास कधीच कमी पडत नाही, असं एकाने लिहिलंय. तर ‘व्हिडीओ काय मस्त झालाय. कमाल टीम’ असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘तुमचं यश बघून खूप भारी वाटतं’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. सर्वसामान्यांसोबतच सुयश टिळक, अश्विनी कासार, सलील कुलकर्णी, अभिजीत खांडकेकर यांसारख्या कलाकारांनीही कमेंट करत टीमचं कौतुक केलं आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारी हास्यमालिका म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. घराघरात हास्याची कारंजी फुलवणारी ही जत्रा ‘सहकुटुंब हसू या’ म्हणत प्रत्येक कुटुंबाला बांधून ठेवण्याचं काम अविरत करत आली आहे. आजवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. आता परदेशात लाइव्ह परफॉर्म करत हे विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत.

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.