रिक्षा, टॅक्सी चालकांवर मराठी भाषेची सक्ती, हास्यजत्रा फेम दिग्दर्शकचं रोखठोक मत, ‘ऑनलाईन क्लास घ्या आणि…’

कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या घोषणेनंतर रिक्षा, टॅक्सी चालकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं. 1 मे पासून राज्यात मराठी भाषेची सक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचं प्राथमिक ज्ञान असणं गरजेचं आहे… एवढंच नाही तर ज्यांना मराठी भाषा येत नाही त्याचे परवाने रद्द केले जातील… अशी घोषणा देखील कॅबिनेट मंत्री प्रताप […]

रिक्षा, टॅक्सी चालकांवर मराठी भाषेची सक्ती, हास्यजत्रा फेम दिग्दर्शकचं रोखठोक मत, ऑनलाईन क्लास घ्या आणि...
| Updated on: Apr 23, 2026 | 12:04 PM

कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या घोषणेनंतर रिक्षा, टॅक्सी चालकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं. 1 मे पासून राज्यात मराठी भाषेची सक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचं प्राथमिक ज्ञान असणं गरजेचं आहे… एवढंच नाही तर ज्यांना मराठी भाषा येत नाही त्याचे परवाने रद्द केले जातील… अशी घोषणा देखील कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. नाईकांच्या या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं आहे तर, महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी 4 मे पासून राज्यव्यापी आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे.

सांगायचं झालं तर, या निर्णयामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. हा निर्णय मागे घ्यावा यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. पण काहीही झालं तरी, निर्णय मागे घेणार नाही… अशी भूमिका प्रताप सरनाईक यांनी घेतली असून… महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचे लेखक दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी स्वतःचं रोखठोक मत मांडलं आहे.

सचिन गोस्वामी यांनी फेसबूकवर एक पोस्ट शेअर करत स्वतःचं मत मांडलं आहे… रिक्षा चालकांना तीन महिन्यांचा व्यवहारउपयोगी मराठी शिकवण्याचा ऑनलाइन क्लास शासनाने तयार करून कंपलसरी करावा..तीन महिन्यांनी ऑनलाइन परीक्षा घेवून पास झालेल्याचा रिक्षा परवाना कायम ठेवून, नापास झालेल्यांचा उत्तीर्ण होईपर्यंत परवाना निलंबित करावा.. हीच पद्धत परभाषिक भाजी विक्रेते, रस्त्यावरील विक्रेते यांच्यात ही राबवता येईल. आपण नागरिकांनी सुद्धा व्यवहारात ठामपणे फक्त मराठीच बोलावे भाषा संवर्धना साठी हे आवश्यक आहे.. महाराष्ट्रात मराठी आलं पाहिजे….. असं देखील सचिन गोस्वामी म्हणाले आहेत. यावर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहे.

तर प्रताप सरनाईक यांच्या निर्णयानंतर रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. कारण मराठी भाषा येत नसल्यास त्यांचा थेट परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील सुमारे 75 टक्के चालक हे हिंदी भाषिक आहेत. अशात हा निर्णय लाखो लोकांच्या पोटापाण्यासाठी धोका निर्माण करणारा आहे… असा दावा संघटनेने केला आहे.

तर दुसरीकडे प्रताप सरनाईक यांच्या निर्णयावर रिक्षा चालक आणि मालक संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक शरद राव यांनी स्पष्ट वक्तव्य केलं आहे. सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर, रिक्षा आणि टॅक्सी चालक राज्यव्यापी आंदोलन छेडतील. तर या आंदोलनाची सुरुवार 4 मे पासून होईल.

Follow Us