AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अख्ख्या जगात दारु विक्रीत घट, भारतात मात्र मद्यविक्री का वाढतेय? नेमकं काय घडतंय?

Alcohol : जगातील अनेक प्रमुख देशांमध्ये मद्याच्या सेवनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात असताना, भारतात मात्र मद्याची मागणी वाढताना दिसत आहे. यामागील कारण जाणून घेऊयात.

अख्ख्या जगात दारु विक्रीत घट, भारतात मात्र मद्यविक्री का वाढतेय? नेमकं काय घडतंय?
India daru MarketImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 13, 2026 | 7:37 PM
Share

जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात दारूचे सेवन केले जाते. एकेकाळी मद्यनिर्मिती कंपन्या अमेरिकेसारख्या, युरोपमधील आणि चीनसारख्या मोठ्या बाजारपेठांवर सर्वाधिक अवलंबून होत्या. मात्र आता परिस्थिती बदलत आहे. जगातील अनेक प्रमुख देशांमध्ये मद्याच्या सेवनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात असताना, भारतात मात्र मद्याची मागणी वाढताना दिसत आहे. मार्केट रिसर्च संस्था IWSR च्या अहवालानुसार, पुढील दहा वर्षांत जागतिक स्तरावर मद्याची खपत कमी होऊ शकते. मात्र या काळात भारतातील मद्याची मागणी सातत्याने वाढत राहण्याची शक्यता आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

मद्यबाजार का मंदावत आहे?

गेल्या काही वर्षांपासून मद्य उद्योगासमोर अनेक नवीन आव्हाने उभी ठाकली आहेत. वाढत्या महागाईमुळे लोकांच्या हातात खर्चासाठी कमी पैसा उरत आहे. याशिवाय आरोग्याबाबत जागरूकता वाढल्याने अनेक लोक मद्यपान कमी करत आहेत. तज्ज्ञांच्या मते, अमेरिका, ब्रिटन, जपान, जर्मनी आणि चीनसारख्या देशांतील तरुण पिढी पूर्वीच्या तुलनेत कमी मद्यपान करत आहे. त्यामुळे आगामी काळात या देशांमधील मद्याची मागणी कमी राहण्याची शक्यता आहे.

भारतात मद्याची मागणी का वाढत आहे?

दुसरीकडे भारताची परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळी आहे. देशातील मोठी युवा लोकसंख्या, वाढते उत्पन्न आणि झपाट्याने होणारे शहरीकरण यामुळे मद्यबाजाराला चालना मिळत आहे. लोकांच्या उत्पन्नात वाढ होत असल्याने ते स्वस्त उत्पादनांऐवजी प्रीमियम आणि ब्रँडेड मद्य खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. IWSR च्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण मद्यविक्री गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढत आहे आणि आगामी काळातही हा वाढीचा वेग कायम राहू शकतो. याचा फायदा मद्य उद्योगाला होऊ शकतो.

भारतावर मोठ्या कंपन्यांची नजर

जागतिक स्तरावरील मागणी कमी होत असताना अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय मद्य कंपन्या भारताला सर्वात महत्त्वाची वाढीची बाजारपेठ म्हणून पाहत आहेत. त्यामुळे अनेक विदेशी कंपन्या भारतीय बाजारात गुंतवणूक वाढवत असून प्रीमियम उत्पादनांवर विशेष भर देत आहेत. एका अंदाजानुसार, 2032 पर्यंत भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी मद्यबाजारपेठ बनू शकतो. जागतिक मद्य उद्योगासाठी हा बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात