AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हरवलेली जमीन शोधण्याचा प्रयत्न’; मोर्चावरून गजनी म्हणत फडणवीसांचा ठाकरेंना टोला, निवडणुकीतील गडबडीच्या आरोपांवर दिलं थेट उत्तर

Devendra Fadnavis News: लोकांनी नाकारल्यावर राग इथे काढतात, असं म्हणत निवडणूक गोंधळाच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर थेट निशाणा डागला आहे.

'हरवलेली जमीन शोधण्याचा प्रयत्न'; मोर्चावरून गजनी म्हणत फडणवीसांचा ठाकरेंना टोला, निवडणुकीतील गडबडीच्या आरोपांवर दिलं थेट उत्तर
| Updated on: Oct 04, 2026 | 8:40 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारांवर वक्तव्य केले आहे. तसेच त्यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज भाजपने तीन जागांसाठी उमेदवारी घोषित केली आहे. अतिशय सक्षम उमेदवार घोषित केले आहेत. तिन्ही जागा आम्ही जिंकू. उर्वरित दोन ठिकाणी आमचे मित्रपक्ष लढतील आणि तेही जिंकतील, असं ते म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पक्षातून ज्याला तिकीट मिळालं आहे ते लढले पाहिजे. ज्यांना मिळालं नाही त्यांनी माघार घेतली पाहिजे. आम्ही जरूर चर्चा करू. एक खूप चांगला एडिशन डॉक्टर स्मिता जाधव यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे. विशेषतः ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्यूशन जी आहे त्यामध्ये पुणे ग्रॅज्युएटकरिता एक अतिशय चांगला उमेदवार म्हणून डॉक्टर स्मिता जाधव यांच्याकडे पाहता येईल. मला निश्चित विश्वास आहे त्यांना लोक निवडून देतील.

ते म्हणाले की, तसेच कौस्तुभ गावडे हे शिक्षकांमध्ये आणि शिक्षण क्षेत्रात खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. विशेषतः विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांचा कार्य उत्तम आहे ते पुणे शिक्षक मतदारसंघात आहेत. तसेच नागपूर पदवीधर मतदार संघात सुधाकर कोहळे हे आमदार राहिलेले आहेत ते भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिले आहेत आणि त्यांनी चांगली मेहनत केली आहे त्यामुळे तीनही उमेदवार आमचे निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्र्‍यांनी व्यक्त केला आहे.

ठाकरे बंधू मोर्चावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पहिल्यांदा तर मला असं वाटतं की हा जो काही मोर्चा या ठिकाणी निघाला हा मोर्चा म्हणजे आपली हरवलेली जमीन शोधण्याचा प्रयत्न होता. आपण स्वतःही बघितलं असेल एवढी हाईप क्रिएट करून देखील त्या मोर्चाला फारसे लोक नव्हते. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर हे सातत्याने म्हणतात की, महाराष्ट्राच्या निवडणुकीत गडबड झाली आणि त्यामुळे ज्ञानेश कुमार यांना हटवा. एसआयआरमुळे ज्ञानेश कुमार यांना हटवा. मी यांना आठवण करून देतो कारण हे गजनी झाले आहेत. त्यामुळे या गजनींना मी आठवण करून देऊ इच्छितो की ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त हे 2025 मध्ये झाले.

त्यांनी पुढे सांगितलं की, महाराष्ट्रातील निवडणुका या 2024 मध्ये झाल्या. महाराष्ट्रातील एसआयआर हे 2026 मध्ये होत आहे. 2025 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त झाले ते 2024 च्या निवडणुकांवर कसा परिणाम टाकू शकतात? त्यामुळे आपण खोटं बोलत असलो तर ते सत्य वाटेल असं तरी बोललं पाहिजे. ते धडधडीत असत्य बोलत आहेत. लोकांनी नाकारल्यावर फ्रस्ट्रेशन येते. या ठिकाणी ते निवडणूक आयोगावर काढत आहेत, अशी टीका मुख्यमंत्र्‍यांनी केली आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात