AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाशिवरात्रीनिमित्त 12 तासांचं खास लाइव्ह स्ट्रिमिंग; घरबसल्या पहा ज्योतिर्लिंगांची आरती अन् बरंच काही..

महाशिवरात्रीनिमित्त तुम्हाला घरबसल्या खास 12 तासांचं लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे. यात 12 ज्योतिर्लिंगांची आरती, ईशा फाऊंडेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनचे कार्यक्रम आणि देवों के देव महादेव या मालिकेतील शिव-पार्वती मिलनाचा खास एपिसोड पाहता येईल.

महाशिवरात्रीनिमित्त 12 तासांचं खास लाइव्ह स्ट्रिमिंग; घरबसल्या पहा ज्योतिर्लिंगांची आरती अन् बरंच काही..
shiv parvatiImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 26, 2025 | 2:16 PM
Share

महाशिवरात्रीनिमित्त जिओ हॉटस्टारवर प्रेक्षकांना 12 तासांचा खास लाइव्ह कार्यक्रम पहायला मिळणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून भक्तांना महाशिवरात्रीचा अद्भुत अनुभव या कार्यक्रमातून घेता येणार आहे. ‘महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट’ असं या कार्यक्रमाचं नाव आहे. महाशिवरात्री देशभरात किती भव्यतेनं साजरा केला जातो याचं दर्शन या कार्यक्रमातून घडणार आहे. यामध्ये देशभरातील ज्योतिर्लिंगांवर होणाऱ्या 20 हून अधिक आरत्यांचा थेट (रिअल टाइम) अनुभव भक्तांना घेता येईल आणि घरबसल्या या सर्व उत्सवांमध्ये सहभागी होता येईल.

वेगवेगळ्या स्ट्रीमिंग्जवरून थेट प्रक्षेपण होणार असल्याने सर्व ज्योतिर्लिंगांवरील 20 हून अधिक आरत्यांमध्ये प्रेक्षक सहभाग घेऊ शकतील. इतकंच नाही तर त्यांना या आरत्यांचं महत्त्व आणि या प्रथांचा अर्थ खोलवर समजून घेता येईल. जिओ हॉटस्टारवर ईशा फाऊंडेशनचा महाशिवरात्रीचा कार्यक्रम लाइव्ह पाहता येणार आहे. कोईंबतूर इथं रात्रभर पार पडणारा कार्यक्रम प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. यामध्ये सदगुरुंच्या ध्यानधारणेचा आणि उपदेशांचाही समावेश असेल. या लाइव्ह सोहळ्यामध्ये भगवान शिवाला समर्पित विविध गाणी आणि नृत्ये सादर केली जातील. याचं नेतृत्त्व लोकप्रिय गायिका, गीतकार आणि संगीतकार सोना मोहपात्रा करणार आहे.

View this post on Instagram

A post shared by JioHotstar (@jiohotstar)

जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लाइव्ह सोहळ्यांमध्ये ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या थेट ध्यानधारणेचाही समावेश असेल. अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही ध्यानधारणा केली जाईल. यासोबतच प्रेक्षक ‘देवों के देव.. महादेव’ ही लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा पाहू शकतील. भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या मिलनाची कहाणी दाखवणारा तीन तासांचा विशेष भाग महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिव-पार्वतीला वंदन करण्याच्या हेतूने प्रसारित केला जाईल. महाशिवरात्रीचा हा अतिभव्य अनुभव प्रेक्षकांना 26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 27 फेब्रुवारीच्या पहाटे 6 वाजेपर्यंत जिओ हॉटस्टारवर घेता येणार आहे.

काय काय पाहता येणार?

– सदगुरुंच्या ध्यानासह ईशा फाऊंडेशनच्या कोईंबतूरमधील रात्रभराच्या सोहळ्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग – श्री श्री रविशंकर यांच्यासह आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ध्यानधारणेचं लाइव्ह स्ट्रीमिंग – गायिका, संगीतकार आणि गीतकार सोना मोहपात्रासह आघाडीच्या संगीतकारांद्वारे भगवान शिवाच्या नावाने मंत्रांचं आणि सांगितिक सादरीकरण – शिव-पार्वती मिलनावरील खास शोचा प्रीमिअर तसंच भगवान शिवाशी जोडलेल्या रुढी, पुराण आणि संस्कृतीचं सखोल दर्शन

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.