AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नागिन’ फेम अभिनेत्री गेल्या ८ दिवसांपासून रुग्णालयात दाखल; प्रकृत्तीबाबत मोठी अपडेट समोर

२ जानेवारीपासून 'नागिन' फेम अभिनेत्रीवर रुग्णालयात उपचार सुरु; प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर येताच चाहते चिंतेत

'नागिन' फेम अभिनेत्री गेल्या ८ दिवसांपासून रुग्णालयात दाखल; प्रकृत्तीबाबत मोठी अपडेट समोर
'नागिन' फेम अभिनेत्री गेल्या ८ दिवसांपासून रुग्णालयात दाखल; प्रकृत्तीबाबत मोठी अपडेट समोर
| Updated on: Jan 11, 2023 | 8:21 AM
Share

Mahekk Chahal Admitted In Hospital: अनेक टीव्ही मालिकांमध्ये चाहत्यांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री महेक चहल (Mahekk Chahal) हिची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली आहे. ज्यामुळे अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या ८ दिवसांपासून अभिनेत्रीचे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महेक सध्ये ‘नागिन 6’ (nagin 6) मालिकेतून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे . आता महेकला न्यूमोनिया झाल्यामुळे अभिनेत्री आराम करत आहे.

न्यूमोनियाची लागण झाल्यानंतर अभिनेत्रीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता अभिनेत्रीची प्रकृती स्थिर आहे. महेकला रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. चाहत्यांना प्रकृतीबाबत माहिती देण्यासाठी तिने खास पोस्ट शेअर केली आहे. (Mahekk Chahal Admitted In Hospital)

चाहत्यांसाठी पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली, ‘माझी प्रकृती आता स्थिर आहे. न्यूमोनियावर मात केल्यानंतर आता मला बरं वाटत आहे आणि मी माझ्या घरी आराम करत आहे. मझ्या सर्व शुभचिंतकांनी दिलेल्या प्रेमाचे आभार मानते…’ (Mahekk Chahal health update)

Mahekk Chahal Health

अभिनेत्री पुढे म्हणते, ‘यावेळी तुम्ही माझ्यासाठी केलेली प्रार्थना फलदायी ठरली. काही काळ कुटुंबासोबत राहण्याची संधी मिळाली. लवकरच तुम्हा सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी परतेल…’ असं महेक पोस्टमध्ये म्हणाली. सध्या अभिनेत्री पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

८ दिवस रुग्णालयात होती अभिनेत्री महेकला न्यूमोनियामुळे २ जानेवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळपास चार दिवस अभिनेत्री रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होती. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अभिनेत्रीला न्यूमोनियाची लागण झाल्याचं लक्षात आलं. आता अभिनेत्रीची प्रकृती स्थिर आहे.

Follow Us
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...