महेश बाबूच्या लेकीचा हृदय पिळवटून टाकणारा Video; अक्षरश: ढसाढसा रडली

महेश बाबूच्या आयुष्यातील अत्यंत भावनिक क्षण; मुलीला सावरताना दाटून आला कंठ

महेश बाबूच्या लेकीचा हृदय पिळवटून टाकणारा Video; अक्षरश: ढसाढसा रडली
Mahesh Babu
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Sep 29, 2022 | 1:33 PM

Video: साऊथ सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) आणि त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महेश बाबूची आई इंदिरा देवी (Indira Devi) यांचं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. आजारपणामुळे त्यांना हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती गंभीर झाल्याने इंदिरा देवी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. महेश बाबूचं संपूर्ण कुटुंब सध्या शोकाकूल आहे. आजीच्या निधनानंतर महेश बाबूची मुलगी सितारा (Sitara) तिचे अश्रू रोखू शकत नाहीये. अखेर महेश बाबू आणि त्याची पत्नी नम्रता तिला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

28 सप्टेंबर रोजी सकाळी महेश बाबू यांची आई इंदिरा देवी यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने महेश बाबूचं संपूर्ण कुटुंब खचलंय. महेश बाबूची मुलगी सितारा ही तिच्या आजीच्या खूप जवळची होती. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये सितारा ढसाढसा रडताना दिसतेय. एका व्हिडीओमध्ये महेश बाबू तिला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये आई नम्रता सिताराला सावरण्याचा प्रयत्न करतेय.

आजीच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेताना सितारा हमसून हमसून रडू लागते. त्यावेळी नम्रता आणि महेश बाबू तिला सावरण्याचा प्रयत्न करतात. मुलीला रडताना पाहून महेश बाबू यांच्याही डोळ्यात अश्रू येतात. हा भावूक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

इंदिरा देवी यांच्या अंत्यदर्शनासाठी विजय देवरकोंडा, राणा डग्गुबत्ती, व्यंकटेश, नागार्जुन, लक्ष्मी मंचू, मोहन बाबू यांसारखे दाक्षिणात्य कलाकार पोहोचले.

महेश बाबूचे वडील कृष्णा यांनी दोनदा लग्न केलं होतं. इंदिरा देवी यांना घटस्फोट दिल्यानंतर त्यांनी दाक्षिणात्य अभिनेत्री निर्मलाशी लग्न केलं. घटस्फोटानंतर इंदिरा देवी एकट्याच राहत होत्या. महेश बाबू त्याच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून आईला भेटायला जात असत.