AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नालायक पिक्चर्स बघतोच आपण..’, ‘नाळ 2’बद्दल महेश मांजरेकरांची पोस्ट चर्चेत

'नाळ 2' या चित्रपटाचं कौतुक अनेक कलाकारांकडून होतंय. विजू माने, आदिनाथ कोठारे, स्मिता तांबे यांच्यानंतर आता महेश मांजरेकर यांची पोस्ट चर्चेत आली आहे. यावेळी मांजरेकरांनी प्रेक्षकांना आवाहन केलं आहे.

'नालायक पिक्चर्स बघतोच आपण..', 'नाळ 2'बद्दल महेश मांजरेकरांची पोस्ट चर्चेत
महेश मांजरेकरांच्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्षImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 02, 2025 | 3:49 PM
Share

मुंबई : 16 नोव्हेंबर 2023 | सध्या सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ भाग 2’ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. दिवाळीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता मराठी कलाकारांचीही या चित्रपटासोबत नाळ जोडली जात आहे. अनेक कलाकार आपल्या सोशल मीडियावरून या चित्रपटाचं भरभरून कौतुक करत आहेत. महेश मांजरेकर, विजू माने, आदिनाथ कोठारे, स्मिता तांबे यांच्यासह अनेक कलाकारांनी या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत.

महेश मांजरेकर यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून खास व्हिडीओ शेअर केला आहे. ”अप्रतिम सिनेमा आहे नाळ 2. अभिमान वाटला, की मराठीत असा चित्रपट यावा. ‘नाळ भाग 2’ हा सिनेमा देशात सगळ्यांनी बघितला पाहिजे. यात तीन मुलांची कामं आहेत. अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये या चित्रपटाला नामांकनं मिळतील. विशेषतः या चित्रपटातील चिमीची भूमिका साकारणाऱ्या त्या चिमुकलीला. मी सांगेन तिचं नामांकन सर्वोत्कृष्ट बालकलाकारमध्ये न घेता ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’मध्ये घ्या,” अशा शब्दांत त्यांनी कौतुक केलं.

“मराठी चित्रपट काहीतरी वेगळं देण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. अतिशय सुंदर चित्रपट आहे. सर्वांनी हा चित्रपट नक्की पाहा,” असं आवाहन मांजरेकरांनी चाहत्यांना केलं. तर दिग्दर्शक विजू माने म्हणतात, ”सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी लेखणीसहित कॅमेऱ्यानेही चित्रपट सुंदर रेखाटला आहे. पात्रांच्या रचना आणि त्यांच्या एकमेकांशी असलेला प्रतिकात्मक संबंध हा अगदी सामान्य प्रेक्षकांनाही कळणारा आहे. कुठलाही अविर्भाव नसलेला हा अत्यंत नैसर्गिक आणि निरागस सिनेमा निखळ आनंद देऊन जातो.”

”प्रत्येक फ्रेम काहीतरी सांगतेय. शब्दांपेक्षा दृष्टिक्षेपातून दाखवण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. बघता बघता आपसूकच कंठ दाटून येतो. अप्रतिम सिनेमा,” अशी प्रतिक्रिया आदिनाथ कोठारे याने दिली आहे. तर स्मिता तांबे म्हणाली, ”एक अत्यंत अप्रतिम अनुभव आहे. भावाबहिणीने, संपूर्ण कुटुंबाने एकत्र जाऊन पाहावा, असा हा सिनेमा आहे. या चित्रपटात अनेक हळव्या भावना आहेत. एखाद्या गावाचे चुकून कॅमेरा शिरला आहे, इतका नैसर्गिक अभिनय ही पत्रे करत आहेत. सुधाकर रेड्डी यंकट्टी, नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओजने एक उत्तम कलाकृती दिवाळीच्या निमित्ताने भेट दिली आहे.” याव्यतिरिक्त प्रियदर्शन जाधव, सोनाली खरे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, प्रथमेश परब आदी कलाकारांनीही ‘नाळ भाग 2’चं विशेष कौतुक केलं आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.