
निर्माता-दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी भारत पाकिस्तान बॉर्डरवर जाऊन भारतीय जवानांच्या मनोरंजनासाठी सातत्याने मराठी तारका कार्यक्रम कोणतेही मानधन न घेता केले आहेत.

जवानांचा उत्साह आणि प्रेम पाहून हीच आयुष्यातील मोठी कमाई असल्याचं महेश टिळेकर म्हणतात.

आत्तापर्यंत बारामुल्ला, उरी, कारगिल आणि साडे अठरा हजार फूट उंचीवर जिथं ऑक्सिजन कमी असतो अशा सियाचेन येथेही हा कार्यक्रम झाला आहे.

राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत मराठी तारका कार्यक्रम करण्याचा मान ही महेश टिळेकर यांना मिळाला आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या मदत निधीसाठी मराठी तारका कार्यक्रमाद्वारे 2 कोटी रुपये निधी उभारण्यात महेश टिळेकर यांचा मोलाचा वाटा आहे.