मुंबई उच्च न्यायालयाचा रामायण चित्रपटाच्या निर्मात्यांना दिलासा, दिले महत्त्वपूर्ण आदेश

मुंबई उच्च न्यायालयाचा रामायण चित्रपटाच्या निर्मात्यांना दिलासा. ‘रामायण’ चित्रपटाच्या पायरसीला आळा घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश.

मुंबई उच्च न्यायालयाचा रामायण चित्रपटाच्या निर्मात्यांना दिलासा, दिले महत्त्वपूर्ण आदेश
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 06, 2026 | 8:22 PM

बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाच्या निर्मात्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. चित्रपटाची ऑनलाइन पायरसी रोखण्यासाठी न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. कॉपीराइट मालकाकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित पायरसी लिंक आणि चित्रपटाशी संबंधित बेकायदेशीर कंटेंट तीन तासांच्या आत हटवण्याचे निर्देश न्यायालयाने इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सना दिले आहेत.

न्यायालयाच्या आदेशानुसार, संबंधित डिजिटल प्लॅटफॉर्म्सना पायरसीविरोधातील तक्रारी स्वीकारण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांचे संपर्क तपशील उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत. तसेच कॉपीराइट मालकाकडून तक्रार मिळाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल, अशी लेखी हमीही संबंधित प्लॅटफॉर्म्सना द्यावी लागणार आहे. यामुळे चित्रपटाच्या बेकायदेशीर ऑनलाइन प्रसारणावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.

Loading...

4 हजार कोटींच्या प्रकल्पाच्या पायरसीविरोधात याचिका

‘रामायण’ हा तब्बल 4 हजार कोटी रुपयांच्या बजेटचा दोन भागांमध्ये तयार होणारा महत्त्वाकांक्षी चित्रपट प्रकल्प आहे. या चित्रपटाच्या पायरसीचा धोका लक्षात घेऊन निर्माते Godpower Media यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती आशिष एस. चव्हाण यांनी पायरसी रोखण्यासाठी महत्त्वाचे निर्देश दिले. यापूर्वी 2 नोव्हेंबर रोजीही न्यायालयाने चित्रपटाच्या पायरसीविरोधात डायनॅमिक इनजंक्शन जारी केले होते.

16 डिसेंबरला पुढील सुनावणी

या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 डिसेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, न्यायालयाच्या ताज्या आदेशामुळे ‘रामायण’ चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्या पायरसीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.

दरम्यान, मोठ्या बजेटच्या ‘रामायण’ चित्रपटाचे कॉपीराइट आणि डिजिटल कंटेंट सुरक्षित ठेवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेली भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेषतः तक्रार मिळाल्यानंतर अवघ्या तीन तासांत पायरसी कंटेंट हटवण्याच्या निर्देशामुळे डिजिटल प्लॅटफॉर्म्सची जबाबदारी वाढली आहे.

सोशल मीडियावर रामायण चित्रपटाची चर्चा

दिवाळीच्या आधी रामायण चित्रपट प्रदर्शित झाला असून तो पाहण्यासाठी देखील प्रेक्षक गर्दी करत आहेत. त्यासोबतच चित्रपटाच्या तिकिटांची देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. रामायण चित्रपटातील अनेक सीन सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us