मुंबई गुन्हे शाखेत मोठा फेरबदल! सलमान खान, बाबा सिद्दीकी, टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी थक्क करणारी अपडेट समोर

मुंबई पोलीस दलात मोठी खळबळ माजली असून सलमान खान, बाबा सिद्दीकी, टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी थक्क करणारी अपडेट समोर आली आहे. एवढंच नाही तर जुन्या प्रकरणांसह 15 हून अधिक गुन्ह्यांप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे.

मुंबई गुन्हे शाखेत मोठा फेरबदल! सलमान खान, बाबा सिद्दीकी, टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी थक्क करणारी अपडेट समोर
Salman Khan
| Updated on: Nov 14, 2026 | 8:34 AM

सलमान खान, बाबा सिद्दीकी, टायगर श्रॉफ यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी आणि अन्य जुन्या प्रकरणांसह 15 हून अधिक गुन्ह्यांप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाकडील सर्व तपासांची सूत्रे इतर युनिट्सकडे सोपवण्यात आली आहेत. या पथकाकडे प्रलंबित असलेले 15 हून अधिक गुन्हे आता गुन्हे शाखेच्या इतर युनिट्सकडे वर्ग करण्यात आले आहेत. अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. जाणून घ्या या हायप्रोफाईल प्रकरणांबद्दल नेमका कोणता निर्णय घेण्यात आला आहे,

मिळालेल्या माहितीनुसार, हस्तांतरित करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये अभिनेता टायगर श्रॉफच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणाचाही समावेश आहे. यापूर्वी याच खंडणीविरोधी पथकाने अभिनेता सलमान खानला मिळालेली धमकी, माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेरील गोळीबार यांसारख्या संवेदनशील आणि हाय-प्रोफाईल प्रकरणांचा तपास केला होता.

Loading...

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, या गुन्ह्यांची विभागणी गुन्हे शाखेच्या विविध युनिट्समध्ये करण्यात आली आहे. यामध्ये क्राईम ब्रँच युनिट 9 कडे सर्वाधिक सहा गुन्हे, युनिट 4 कडे चार गुन्हे, तर युनिट 3 कडे दोन ते तीन गुन्ह्यांचा तपास सोपवण्यात आला आहे. उर्वरित गुन्हे हे संबंधित घटनास्थळांच्या हद्दीनुसार इतर युनिट्सकडे वर्ग करण्यात आले आहेत.

खंडणीविरोधी पथकाच्या कार्यपद्धतीबाबत गेल्या काही दिवसांपासून गंभीर प्रश्न उपस्थित केले जात होते. पथकातील कथित अनियमितता, तपासातील तांत्रिक त्रुटी आणि जप्त केलेल्या शस्त्रांच्या नोंदीतील विसंगतींच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवरून हे कठोर पाऊल उचलण्यात आल्याचे बोलले जात आहे. विशेषतः जप्त शस्त्रांच्या नोंदींमधील तफावतीची गंभीर दखल घेण्यात आल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, खंडणीविरोधी पथकाचा संपूर्ण सक्रिय तपास काढून घेण्यामागील नेमक्या आणि अधिकृत कारणांबाबत मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही स्पष्ट घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, या निर्णयामुळे आगामी काळात या पथकात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us