AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ankita Bhandari Case: देशाला हादरवून सोडणाऱ्या अंकिता भंडारी प्रकरणात ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचं कनेक्शन? होणार नार्को टेस्ट

Ankita Bhandari Case Actress Connection: उत्तराखंडमधील चर्चित अंकिता भंडारी हत्याकांड प्रकरणी आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीचं कनेक्शन समोर आलं असून तिची नॉर्को टेस्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Ankita Bhandari Case: देशाला हादरवून सोडणाऱ्या अंकिता भंडारी प्रकरणात 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचं कनेक्शन? होणार नार्को टेस्ट
ankita bhandari case
| Updated on: Nov 14, 2026 | 8:25 AM
Share

उत्तराखंडमधील चर्चित अंकिता भंडारी हत्याकांडने देशात खळबळ माजवली होती. यामध्ये अनेक VIP कनेक्शन आहेत. आता असच एक कनेक्शन समोर आलं असून एका प्रसिद्ध अभिनेत्रीच नाव यात चर्चेत आहे. ही अभिनेत्री आहे उर्मिला सनावर. अभिनेत्री उर्मिला सनवार काल डेहराडूनमधील सीबीआय न्यायालयात पोहोचली. तिने तिथे नार्को चाचणीसाठी आपली संमती दिली. ही चाचणी शुक्रवारी झालेल्या न्यायालयीन सुनावणीनंतर गुजरातच्या गांधीनगरमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अभिनेत्री उर्मिलाने असा दावा केला आहे की, २५ ऑक्टोबरला तिला सहारनपूरमधून अटक करण्यात आली होती. तिने असा आरोप केला की, अटकेपूर्वी तिला २५ लाख रुपये आणि एक ‘स्कॉर्पिओ’ वाहन देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते; तसेच, २६ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर न राहण्यासही तिला सांगण्यात आले होते.

अभिनेत्री उर्मिलाने पोलिसांच्या कारवाईवर केले प्रश्न उपस्थित!

उर्मिलाने तिच्या अटकेनंतर या अटकेला एक कट असल्याचे म्हणत पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. कोर्टात पोहचलेल्या उर्मिलाने असा दावा केला की, तिच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला खटला एका कटाचा भाग आहे. एवढंच नाही तर तिने असाही आरोप केला की, अटकेच्या आधी तिला डीएस रावत नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला होता, ज्याने तिला ‘स्कॉर्पिओ’ गाडी आणि २५ लाख रुपये देण्याची ऑफर दिली होती.

पोलिसांवर केले मोठे आरोप

अभिनेत्री उर्मिलाने राणीपुर पोलीस स्थानकातील पोलिसांवर मोठे आरोप केले आहेत. तिच्या मते अनेक पोलिसांच्या गाड्या सकाळी तिच्या घरी आल्या. पण या आधीच तिच्या घराची रेकी करण्यात आलेली. तिने असाही आरोप पोलिसांवर केला आहे की, घराच्या इथे लावलेले CCTV कॅमेऱ्यांचं फुटेज आणि हार्ड डिस्क सोबतही छेडछाड केली गेली आहे.

यासह उर्मिलाने असाही दावा केला की, तिला कोणतीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तिने म्हटले की, तिच्या बाबतीत वेगळे निकष लावले जात आहेत. मात्र, या आरोपांबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

काय आहे अंकिता भंडारी हत्याकांड?

उत्तराखंडच्या पौरी गढवाल जिल्ह्यात सप्टेंबर २०२२ मध्ये १९ वर्षीय अंकिता भंडारीची हत्या करण्यात आली. ती ऋषिकेशजवळील ‘वनंतरा रिसॉर्ट’मध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. या प्रकरणात, रिसॉर्टचा मालक पुलकित आर्य आणि त्याच्या दोन कर्मचाऱ्यांवर अंकिताची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. आरोप असा होता की, अंकितावर एका व्हीआयपी गेस्टला विशेष सेवा पुरवण्यासाठी दबाव टाकला जात होता. तिने याला विरोध केला असता, तिची हत्या करण्यात आली. ती बेपत्ता झाल्यानंतर सुमारे सहा दिवसांनी तिचा मृतदेह चिल्ला कालव्यातून सापडला. पुढे, न्यायालयाने पुलकित आर्य आणि त्याच्या दोन कर्मचाऱ्यांना या हत्येसाठी दोषी ठरवले.

पण आता अंकिता हत्या प्रकरणातील एका ‘व्हीआयपी’च्या कथित भूमिकेबाबतचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. अभिनेत्री उर्मिला सनवार हिने सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे, जी भाजपचे माजी आमदार सुरेश राठोड यांच्यासोबतच्या संभाषणाची असल्याचे सांगितले जात आहे. या ऑडिओमध्ये एका ‘व्हीआयपी’चा उल्लेख असल्याचे म्हटले जात आहे.

Follow Us
दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा..
NCP : दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, मुंबईत सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा; राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय?
पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बसचा गंभीर अपघात, बस चालक आणि....
Pune-Solapur Highway : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बसचा गंभीर अपघात, बस चालक आणि प्रवासी जखमी; वाहतुकीचा खोळंबा
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
Microsoft Services Down : मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्सना फटका; ई-मेल पाठवणं आणि उघडणं कठीण
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...