AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8th Pay Commission: मोठी बातमी, 8वा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांना थकबाकी मिळणार? अपडेट काय?

8th Pay Commission Arrears: 8 वा वेतन आयोग कधी लागू होणार याची कर्मचाऱ्यांना प्रतिक्षा आहे. आयोगाने अद्याप शिफारशींचा अंतिम अहवाल सादर केलेला नाही. शिफारशी जर 1 जानेवारी 2026 रोजीपासून लागू झाला तर पात्र कर्मचार्‍यांना थकबाकीचा लाभ मिळू शकतो.

8th Pay Commission: मोठी बातमी, 8वा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांना थकबाकी मिळणार? अपडेट काय?
8वा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांना थकबाकी मिळणार?
| Updated on: Nov 14, 2026 | 8:24 AM
Share

8th Pay Commission Arrears: 8 वा वेतन आयोग लागू होण्याची प्रतिक्षा करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. आता हे वर्ष संपण्यासाठी अवघा एक महिना उरला आहे. पण नवीन वेतन आयोगाविषयी अद्यापही मोठी घोषणा झालेली नाही. निदान शिफारशींचा अंतिम अहवाल कधी सादर होणार याविषयी तरी हिवाळी अधिवेशनापूर्वी घोषणा व्हावी अशी मागणी कर्मचारी करत आहेत. त्याचवेळी हा आयोग लागू होण्यापूर्वी सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठी चिंता सतावत आहे. वाढलेल्या पेन्शनचा लाभ मिळेल का? सेवानिवृत्तीनंतर थकबाकीचा लाभ मिळेल का? याची चिंता त्यांना लागली आहे.

8 वा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी सेवानिवृत्तीवर मिळेल थकबाकी?

जर कर्मचारी 8 वा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्यापूर्वीच सेवानिवृत्त झाला तर त्याला थकबाकी मिळेल का? असा सवाल विचारल्या जात आहे. सरकार नवीन वेतन आयोग कधीपासून लागू करणार त्या तारखेवर हे अवलंबून आहे. जर एखादा कर्मचारी 2027 मध्ये सेवानिवृत्त झाला आणि सरकारने नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 रोजीपासून लागू करण्याचा निर्णय घेतला. तर अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना मधल्या काळातील तफावत, थकबाकी मिळू शकते. अर्थात याविषयी सरकार अजून कोणत्या अटी आणि शर्ती ठेवणार यावर थकबाकीचे गणित अवलंबून असेल.

रिटायरमेंटनंतर वाढेल पेन्शन?

8 व्या वेतन आयोगासंबंधी काही बदल होऊ शकतो. अगोदर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो. अजून याविषयी सरकारने कोणताही अधिकृत घोषणा केलेली नाही. जर सरकार याविषयीच्या शिफारशी स्वीकारणार असेल आणि पेन्शनमध्ये सुधारणा करणार असेल तर नवीन वेतन आयोग लागू होण्यापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शनचा लाभ मिळू शकतो. सरकार पेन्शनमध्ये सुधारणा करून पूर्वलक्षी प्रभावाने ती लागू करत असले तर जुन्या आणि नवीन पेन्शनमधील फरक, तफावत रक्कम एरिअर, थकबाकी म्हणून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळू शकते. सरकार काय निर्णय घेते यावर हे अवलंबून असेल.

कधी लागू होणार 8 वा वेतन आयोग?

8 वा वेतन आयोग लागू होण्याची कोणताही तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. पण सरकार हा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 रोजीपासून लागू करण्याची शक्यता आहे. सध्या नवीन वेतन आयोग विविध शहरात जाऊन कर्मचारी, संघटना यांची मतं, तक्रारी, हरकती जाणून घेत आहे. नवीन वेतन आयोगाचे वेतन बँक खात्यात जमा होण्यासाठी वर्ष 2027 चे अर्धे वर्षेही लागू शकते. त्यावेळी पात्र कर्मचाऱ्यांना वेतन थकबाकी मिळेल.

Follow Us
दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा..
NCP : दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, मुंबईत सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा; राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय?
पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बसचा गंभीर अपघात, बस चालक आणि....
Pune-Solapur Highway : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बसचा गंभीर अपघात, बस चालक आणि प्रवासी जखमी; वाहतुकीचा खोळंबा
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
Microsoft Services Down : मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्सना फटका; ई-मेल पाठवणं आणि उघडणं कठीण
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...