मलायका अरोराचे बदलले सूर, सततच्या टीकेनंतर अभिनेत्रीचा मोठा निर्णय, फोटो शेअर करत..
Malaika Arora Post : मलायका अरोरा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा हिच्या खासगी आयुष्यामध्ये बऱ्याच घडामोडी बघायला मिळत आहेत. एका व्हिडीओमुळे मलायका ही चांगलीच चर्चेत आली.
मुंबई : मलायका अरोरा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा हिने मोठा काळ गाजवला आहे. मलायका अरोरा हिने 2016 मध्ये घटस्फोट घेतला. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याला डेट करत आहे. नेहमीच सोशल मीडियावर अर्जुन कपूर याच्यासोबतचे खास फोटो शेअर करताना मलायका अरोरा दिसते. मात्र, अनेकांना अर्जुन कपूर आणि मलायकाची जोडी अजिबातच आवडत नाही.
गेल्या दोन दिवसांपासून मलायका अरोरा हिच्यावर जोरदार टीका होताना दिसली. हेच नाही तर मलायका अरोरा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. मलायका अरोरा हिने काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की, ती शाकाहारी आहे. मात्र, झलक दिखला जा 11 च्या सेटवरील एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसला.
या व्हिडीओमध्ये चक्क मासांहारी जेवण करताना मलायका अरोरा ही दिसली. यामुळे लोक मलायका अरोरा हिला खडेबोल सुनावताना दिसले. हेच नाही तर मलायका अरोरा हिला खोटारडी देखील अनेकांनी म्हटले. मलायकाचा तो व्हिडीओ व्हायरल होत असतानाच आता परत एकदा मलायका अरोरा ही चांगलीच चर्चेत आल्याचे बघायला मिळत आहे.
मलायका अरोरा हिने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. मलायका अरोरा हिने तिच्या नाश्त्याच्या प्लेटचा फोटो शेअर केलाय. हेल्दी नाश्त्याची प्लेट मलायका अरोरा हिने शेअर केलीये. मलायका अरोरा हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये मल्टीग्रेन ब्रेड टोस्टेड सॅंडविच दिसत आहे. यासोबतच ब्लूबेरी आणि चेरी टमाटर दिसत आहेत.
हा फोटो शेअर करत मलायका अरोरा हिने कॅप्शनमध्ये म्हटले की, माझ्या दिवसाची हेल्दी सुरूवात..आता मलायकाचा हा फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये एकही मासांहारी पदार्थ हा दिसत नाहीये. मलायका अरोरा हिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये सर्व शाकाहारीच पदार्थ हे दिसत आहेत. यामुळे अनेकांनी हे फोटो पाहून म्हटले की, होत असलेल्या टीकेनंतर मलायका अरोराचे सूर बदलले आहेत.