
Bollywood Actress Malaika Arora : अभिनेत्री मलायरा अरोरा हिने सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारल्या नाहीत, पण आयटम गर्ल म्हणून मलायका प्रसिद्ध झोतात आली… मलायका तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. आज वयाच्या 50 व्या वर्षी देखील मलायका तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत असते. मलायका हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 22 व्या वर्षी अभिनेत्रीने अभिनेता अरबाज खान याच्यासोबत लग्न केलं. दोघांना 19 वर्षांचा एक मुलगा देखील आहे.
काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर लग्नाच्या 19 वर्षानंतर अरबाज आणि मलायका एकमेकांपासून विभक्त झाले… घटस्फोटानंतर मलायका हिने तरुण मुलींना मोठा सल्ला दिलेला… लग्न करण्याती घाई करु नका… असं अभिनेत्री म्हणाली होता…
एका मुलाखतीत मलायका म्हणालेली, ‘मला एक गोष्ट कळत नाही, काही मुलींना लग्न करण्याची प्रचंड घाई असते… प्रत्येक तरुण मुलींनी लग्नाआधी थोडा वेळ घेतला पाहिजे… थोडंफार आयुष्य समजून घ्या… आधी काहीतरी काम करा… त्यानंतर लग्नासारखा मोठा निर्णय घ्या… इतक्या लवकर लग्न करण्याची काहीही घाई नाही… माझं तर फार कमी वयात लग्न झालं होतं… त्यामुळए तुमचा वेळ घेऊन लग्न करा… असा सल्ला मलायका अरोरा हिने तरुण मुलींना दिला आहे…
सांगायचं झालं तर, 2017 मध्ये अरबाज याच्यासोबत घटस्फोट झाल्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर, मलायका हिने 2019 मध्ये अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत असलेलं रिलेशनशिप सर्वांसमोर स्वीकारलं होतं. पण दोघांचं नातं देखील फार टिकलं नाही. काही महिन्यांपूर्वी दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या. तर एकदा अर्जुन स्पष्ट म्हणालेला, ‘मी आता सिंगल आहे…’.
अर्जुन कपूर याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अनेकदा मलायका हिला मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट करण्यात आलं. त्यामुळे मलायका पुन्हा खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मलायका सोबत दिसणारा मिस्ट्रीमॅन 33 वर्षीय हिरा व्यापारी हर्ष मेहता आहे. अर्जुनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायका हर्षला तर डेट करत नाही ना? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.