AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malaika Arora: “मी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त…”; अर्जुन कपूरबद्दल मलायका असं का म्हणाली?

मलायकाने आधी स्वत: उडवली अर्जुनसोबतच्या नात्याची खिल्ली अन् नंतर..

Malaika Arora: मी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त...; अर्जुन कपूरबद्दल मलायका असं का म्हणाली?
'आम्ही एकमेकांसाठी...', मलायका अरोरा हिच्यासोबत असलेल्या नात्यावर अर्जुन कपूर याचा मोठा खुलासाImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 09, 2022 | 8:50 AM
Share

मुंबई: अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या दोघांच्या वयातील अंतरामुळे नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली तर कधी टीका केली. आता त्या सर्व ट्रोलर्सना मलायकाने आपल्याच अंदाजात उत्तर दिलं आहे. ‘मूव्हींग इन विथ मलायका’ या शोच्या चौथ्या एपिसोडमध्ये मलायका स्टँडअप कॉमेडियन बनली आहे. यावेळी तिने तिच्या चालण्यावरून, अरबाज खानला घटस्टोफ दिल्यावरून, अर्जुन कपूरला डेट करण्यावरून जे ट्रोल करतात, त्यांना उपरोधिक उत्तर दिलं आहे.

व्यंगात्मक पद्धतीत मलायका म्हणाली, “दुर्दैवाने मी फक्त वयाने मोठी नाही तर माझ्यापेक्षा छोट्या व्यक्तीला डेट करतेय. माझ्यात हिंमत आहे. मी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतेय, बरोबर बोलली ना? मी सर्वांना सांगू इच्छिते की मी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करत नाहीये.”

“असं नाहीये की तो शाळेत जात होता आणि आता त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करू शकत नाहीये. प्रत्येक वेळी आम्ही डेटवर असताना तो त्याचे क्लासेस बंक करतो असंही नाही. तो रस्त्यावर पॉकेमॉन पकडताना मी त्याचा पाठलाग करते, अशातलाही भाग नाही. आता तरी समजा की तो मोठा माणूस आहे. मर्द है वो”, अशा शब्दांत तिने ट्रोलर्सना उत्तर दिलं.

अर्जुनला डेट करण्याविषयी ती पुढे म्हणाली, “जेव्हा एखादा वयाने मोठा असलेला मुलगा छोट्या मुलीला डेट करतो, तेव्हा तो प्लेयर. पण जेव्हा वयाने मोठी असलेली मुलगी एका मुलाला डेट करते, तेव्हा तिला कॉगर (Cougar) म्हटलं जातं. हे बरोबर नाही.”

मलायकाच्या या शोमध्ये अर्जुन कपूर स्वत: हजेरी लावू शकला नव्हता. मात्र त्याने व्हिडीओच्या माध्यमातून मलायकासाठी खास संदेश पाठवला. “ही स्टँडअप कॉमेडी करण्यासाठी तू जेव्हा तयार झालीस तेव्हाच तू ही लढाई जिंकलीस. मला माहितीये की तू सर्वांत विनोदी व्यक्ती आहेस, कारण तू माझ्या सर्व विनोदांवर मोकळेपणे हसतेस”, असं तो म्हणाला.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.