AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malaika Arora: मलायकाने सांगितल्या ‘त्या’ भयंकर अपघाताच्या आठवणी; “डोळे उघडले तेव्हा समोर होता अरबाज”

"मला वाटलं माझा जीवच गेलाय"; अपघाताविषयी मलायका झाली व्यक्त

Malaika Arora: मलायकाने सांगितल्या 'त्या' भयंकर अपघाताच्या आठवणी; डोळे उघडले तेव्हा समोर होता अरबाज
Malaika Arora: मलायकाने सांगितल्या त्या अपघाताच्या भयंकर आठवणीImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 06, 2022 | 7:51 AM
Share

मुंबई: अभिनेत्री मलायका अरोराचा ‘ मूव्हिंग इन विथ मलायका ‘ हा शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमध्ये मलायका तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त होणार आहे. पहिल्याच एपिसोडमध्ये तिने अपघाताच्या भयंकर आठवणी सांगितल्या. इतकंच नव्हे तर शुद्धीवर आल्यानंतर तिच्या डोळ्यांसमोर असलेली पहिली व्यक्ती अरबाज खान होता, असंही तिने सांगितलं. या अपघातात मी वाचेन की नाही अशी मला भीती होती, पण जेव्हा पुनर्जीवन मिळालं तेव्हा मी आयुष्य मनमोकळेपणाने जगायचं ठरवलं, असं मलायका म्हणाली.

अपघाताच्या कटू आठवणी

प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि मलायकाची खास मैत्रीण फराह खान हिने शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये हजेरी लावली. यावेळी फराहशी बोलताना मलायकाने तिच्या अपघाताच्या कटू आठवणी सांगितल्या. “लोकांनी भरलेल्या एका बसने आमच्या कारला धडक दिली होती. बसचालकाचा तोल सुटला आणि ती थेट आमच्या कारला धडकली. मला खरंच असं वाटलं होतं की माझा जीव गेलाय. माझ्या डोक्याला दुखापत झाली होती, डोळ्याला काचेचे छोटे तुकडे लागले होते. मला समोरचं काहीच दिसेनासं झालं होतं,” असं ती म्हणाली.

“काही तास मला समोरचं काहीच दिसत नव्हतं. मला खरंच वाटलं की माझा जीव गेलाय आणि मी आता माझ्या मुलाला कधीच भेटू शकणार नाही. मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर जेव्हा मी पहिल्यांदा मी डोळे उघडले तेव्हा मला अरबाज दिसला. मला नीट दिसतंय का, हे तो मला विचारत होता. मी शुद्धीवर आहे का हे तपासून पाहण्यासाठी तो हात दाखवून ही किती बोटं आहेत असं विचारत होता. काही सेकंदांसाठी मला वाटलं होतं की मी पुन्हा भूतकाळात गेले,” असा अनुभव मलायकाने सांगितलं.

अरबाजविषयी बोलताना ती पुढे म्हणाली, “त्यावेळी माझ्या मनाला भिडलेली गोष्ट म्हणजे कठीण काळात, माझा भूतकाळ, वर्तमान किंवा भविष्य, जे काही असेल, तो माझ्यासोबत होता.”

2 एप्रिल 2022 रोजी मलायकाचा खोपोलीत अपघात झाला होता. ती शूटिंगनंतर पुण्याहून मुंबईला येत होती तेव्हा हा अपघात झाला होता. या अपघातात मलायकाच्या डोक्याला मार लागला होता.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.